“सामुदायिक विवाह ही लोक चळवळ व्हावी”:- अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता सामुदायिक विवाह ही लोक चळवळ व्हावी असे आवाहन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
कोपरगाव तालुक्यातील जनतेच्या दुष्काळ,पाणी टंचाई, महापूर किंवा कोविड सारखी महामारी या सर्वच संकटात कोल्हे व काळे कुटुंब नेहमी पाठीशी असते
काल संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने सर्व धर्मीय सामुदायिक विवाहाचे देखणे आयोजन करण्यात आले होते
वाढती महागाई,घसरलेली आर्थिक स्थिती यात सामुदायिक विवाहाचे आयोजन करून युवा नेते विवेक कोल्हे यांनी सर्व १७ कुटुंबांना मोठा दिलासा दिला
आर्थिक परिस्थिती मेटाकुटीला आल्याने मुलांचे शिक्षण, विवाह या साठी सर्वसामान्य कुटुंबाला मोठी आर्थिक कसरत करावी लागते श्रीमंत लोक आपल्या मुलामुलींच्या लग्नावर अक्षरशः लाखो रुपये उधळतात महागडी मंगल कार्यालये, सुग्रास जेवणावळी, संसार उपयोगी साहित्य,भेटवस्तू ,
कपडे, डीजे, मानपान फटाके, दारुगोळा यावर मोठा खर्च केला जातो आर्थिक परिस्थती चांगली असणाराना पाच दहा लाख रुपयांचा काहीच वाटत नाही पूर्वी बहुतेक लग्न दारासमोर व्हायची मात्र आता मंगल कार्यलया शिवाय लग्न होत नाही मात्र हीच फॅशन गरिबांना अनुकरण करावी लागते व जन्मभराची आर्थिक जमापुंजी लग्न कार्यावर खर्च करून प्रसंगी कर्ज काढून लग्न थाटामाटात करावी लागतात सर्वांची आर्थिक परिस्थिती एव्हढा खर्च करण्याची असतेच असे नाही तरी देखील सर्वांना मुलांच्या विवाहासाठी खर्च करावाच लागतो
काल झालेला सामुदायिक विवाह सोहळा हा सर्व सामान्य नागरिकांना दिलासा देणारा होता आयोजकांनी पाव्हण्यांची सरबराई ठेवताना कोणतीही कसर ठेवली नाही विशेष म्हणजे देशात जातीय व धार्मिक तेढ निर्माण झालेला असताना सर्वच जाती धर्माचे विवाह या ठिकाणी संपन्न झाले तसेच सर्व धर्मीय संत महंत भन्ते ,धर्मगुरू यांचे भावी वधूवरांना आशीर्वाद मिळाले
कोपरगाव तालुक्यात कोल्हे व काळे कुटुंबीय साखर कारखाने, बँका यांच्या निवडणुकी साठी एकत्र येऊन समझोता करतात असे म्हटले जाते तसेच कोणाचे किती नगर सेवक निवडून येतात व नगर पालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत सोसायटी निवडणूक या मध्ये चढाओढ चालते त्या प्रमाणे पुढील काळात कोणाच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त गोरगरीब मुलांचे लग्न होतील या करिता देखील चढाओढ करावी त्याच प्रमाणे कार्यकर्त्यांनी देखील आपल्या मुलामुलींचे विवाह या सामुदायिक विवाह सोहळ्यात कसे संपन्न होतील या करिता प्रयत्न करावे व मुलामुलींच्या लग्नावर होणारा खर्च भावी वधू वरांच्या आर्थिक उन्नती साठी खर्च करावा त्याच प्रमाणे कार्यकर्त्यांच्या मुलाच्या विवाहाला हजेरी लावून प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण करण्यापेक्षा सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्न करावे म्हणून आग्रह केला तर मोठी आर्थिक बचत होऊन सामुदायिक विवाह सोहळे लोक चळवळ म्हणून उभे राहतील व भविष्यात सामुदायिक विवाह सोहळ्यात शंभरी गाठून जास्तीत जास्त विवाह होतील असा आशावाद व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *