
कोपरगाव प्रतिनिधी:-
आजच्या महागाईच्या जमान्यात कुटुंब कसे चालवावे असे सामान्य नागरिकांचा मोठा प्रश्न उभा राहिला असतांना महागाई वाढत आहे.मात्र रोजगाराचे साधने कमी होत आहे.त्यातच कोरोनामुळे दोन वर्ष लाँकडाऊनमुळे बाजारपेठ बंद होती.अनेकांचे व्यवसाय डबघाईला गेले तर काहींचे व्यवसाय बंदही झाले.अनेकांचे व्यवसाय व्यापारात बदल झाले.यावर मात करण्यासाठी अश्विनीताई होणे यांनी उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे व शहर प्रमुख कलविंदर सिंग डडियाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महिलासांठी रोजगार मिळवून देण्याचे ठरवले.शिवसेना हा पक्ष २० टक्के राजकारण तर ८० टक्के समाजकारण या प्रमाणे अश्विनीताई होणे यांनी महिलासाठी शिवणक्लास प्रशिक्षण देण्यात ठरविले कोपरगाव शिवसेना महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख अश्विनीताई होणे यांनी महिलांना रोजगार मिळावा यासाठी शिवणकाम प्रशिक्षणाचे आयोजन केले होते.यासाठी अश्विनीताई होणे यांनी पुढाकार घेवुन अतिशय अल्प दरात, तिन महिण्याचे प्रक्षिक्षण वर्गाचे आयोजन केले होते.या प्रशिक्षणामुळे महिलांना रोजगार मिळणार आहे.या तिन महिण्यात महिलांना शिवणकाम चांगल्या प्रकारे शिक्षण दिले असुन महिलांना अंत्यत चांगल्या पद्धतीने कपडे शिवले आहे.सदरचे प्रशिक्षण वर्गासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विशाल झावरे यांनी संत ज्ञानेश्वर इग्लिश स्कुलचे वर्ग उपलब्ध करुन दिले.त्यांचे सहकार्य या कार्यक्रमासाठी लाभले आहे.

या प्रशिक्षणासाठी पडळकर सर यांनी महिलांना प्रशिक्षण दिले आहे.पडळकर सरांचे ही खुप मोलाचे सहकार्य प्रशिक्षणार्थी महिलांना मिळालं. तीन महिण्याचे प्रशिक्षण संपन्न.झाले असुन महिलांनी अश्विनीताई होणे यांचे आभार मानले आहे.शिवसेना कोपरगाव शहरप्रमुख कलविंदरसिंग दडियाल यांनी महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख अश्विनीताई होणे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे.कल्पना सोनवणे, सोनिया साबळे, वैशाली साबळे, शुभांगी धिवर,सुजाता साळवे,नंदा साळवे,सत्यभामा साळवे,सुरेखा पाठक,मनीषा जिरे आदि महिलांना या शिवणक्लास मधून प्रशिक्षण घेतले आहे.
