सर्व सामान्य गोर गरीबांचा कैवारी हरपला…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री.सुभाषराव (आण्णा) रंगनाथ आव्हाड यांचे आज दि.३ फेब्रुवारी पहाटे निधन झाले‌. त्यांच्या पच्छात पत्नी , दोन मुले , मुलगी ,सुना नातवंड असा मोठा परिवार आहे . त्यांच्या निधनाने जेऊर कुंभारी गावात शोककळा पसरली आहे .
सुभाषराव आव्हड यांच्या निधनाबद्दल संजीवनी उघोग समुहाचे चेअरमन बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे तसेच औद्योगीक वसाहतीचे चेअरमन विवेक भैय्या कोल्हे यांनी शोक व्यक्त केला आहे.


जेऊर कुंभारीचे माजी सरपंच विठ्ठलराव आव्हाड यांचे भाऊ होते .
सुभाषराव आव्हाड हे जेऊर कुंभारी गावाच्या विकासाठी नेहमी प्रयत्नशील असायचे , तसेच गोरगरिब लोकांना मदत करीत असे. सामाजीक व धार्मिक कामात नेहमी अग्रेसर होते. सुभाषराव आव्हाड यांना प्रेमाने लोक अण्णा म्हणत असत अण्णांनी आपल्या कार्यकाळात संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे दोन वेळा उपाध्यक्ष व संचालकपद, तसेच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पद व माजी संचालक,जेऊर पाटोदा सेवा संस्थेचे अध्यक्ष जेऊर कुंभारी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, आदी पदे भुषविली आहेत.
अश्या या समाजसेवकास भावपूर्ण श्नद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *