
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरातील भुमीलेख अभिलेख कार्यालयाला सदिच्छा भेट देवून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली आहे.यासंदर्भात अधिक माहिती अशी की,घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतम बनसोडे यांनी भुमिअभिलेख कार्यालयाचे उप अधिक्षक श्री.संजय भास्कर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.या प्रसंगी त्यांना विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली आहे.यावेळी घटनाकार मैत्री संघाचे अध्यक्ष गौतम बनसोडे देशभक्ती सेवा मंचचे अध्यक्ष रवींद्र जगताप अल्ताफ शहा,वसिम शेख, घटनाकार मैत्री संघाचे विशाल आव्हाड ,संजय ससाणे अरुण उदावंत आदि बांधव उपस्थित होते.
