श्रीक्षेत्र चास ते पंढरपुर पायी दिंडी सोहळा…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
सालाबादप्रमाणे याहीवर्षी श्रीक्षेत्र चासनळी ते पंढरपुर पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हभप बाबूराव महाराज चांदगुडे यांनी दिली.
गेल्या दोन वर्षापासुन कोरोना आपत्तीमुळे पायी दिंडी सोहळयावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यावर्षी वारकरी बांधवांचा हा सोहळा पुन्हा सुरू झाला आहे. तरी भाविकांनी या पायी दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले आहे. ही दिंडी २१ जून रोजी चासनळी येथुन पंढरपुरकडे मार्गस्थ होईल तर ११ जुलै रोजी उजनी इरिगेशन कॉलनी चंद्रभागानगर पंढरपुर येथे दिंडी मुक्कामी पोहोचेल. पायी दिंडीत सामील होणा-या वारकरी व्यवस्थेची दरमजल दरकोस मुक्कामाची सोय करण्यांत आली आहे. विठुरायाचे अखंड नाम संकतनातुन सार्वजनिक स्वास्थ उत्तम रहावे यासाठी प्रयत्न असल्याचे हभप बाबूराव महाराज चांदगुडे, हभप उत्तम महाराज लांडगे, हभप गणपत महाराज कोकाटे, हभप शांताराम महाराज गाडेकर, हभप प्रभाकर महाराज कोकाटे, हभप नवनाथ महाराज अडसरे शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *