संजीवनी पाॅलीटेक्निकच्या ४७ विध्यार्थ्यांची बजाज ऑटो मध्ये निवड:- श्री. अमित कोल्हे…

Uncategorized

                                                कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत यशस्वी वाटचाल...

कोपरगांव प्रतिनिधी:-
संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकच्या ४७ विध्यार्थ्यांची वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या बजाज ऑटो लिमिटेड या कंपनीने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत ट्रेनी इंजिनिअर्स या पदावर मुलाखती घेवुन निवड केली आहे. संजीवनी पाॅलीटेक्निक हे ऊद्योग जगताला आवश्यक असलेले मनुष्यबळ पुरविण्यास योग्य दिशेने वाटचाल करीत असल्याची पावती विध्यार्थ्यांच्या अंतिम निकाला अगोरदच नोकऱ्यांसाठी निवड होत असल्याने मिळत आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनजिंग ट्रस्टी श्री. अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री. कोल्हे पुढे म्हणाले की ऊद्योग जगताची गरज ओळखुन संजीवनीमध्ये विध्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासून न मुलाखती कशा द्याव्यात, आपापल्या क्षेत्रात कोणते अद्ययावत ज्ञान घ्यावे, संभाषण कौशल्य, देहबोली, इत्यादी बाबींचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यामुळेच संजीवनीचे विध्यार्थी मोठ्या संख्येने नामांकित कंपन्यांच्या कसोटीत उतरत आहेत. बजाज ऑटो कंपनीने निवड केलेल्या विध्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग, मेकॅनिकल इंजिनिअरींग व मेकॅट्राॅनिक्स विभागातील समृध्दी कैलास गोर्डे, जयेश गंगाधर डांगे, प्रसाद अरविंद चव्हाण, गार्विता प्रदिप मोरे, अवांतिका सतिश भोसले, श्रृतिका पांडुरंग गोरे, कल्याणी प्रकाश भोरकडे, अजय नानासाहेब मोरे, सारीका प्रकाश गुंजाळ, प्रज्वल राधाकृष्ण दवंगे, वेदांत वरूण पाटील, शीतल भागीनाथ शेलार , देवेंद्र राजेंद्र साळवे, वैष्णव संजय भाकरे, विवेक बाबासाहेब जपे, प्रसाद दादासाहेब टुपके, साई विजय होन, समाधान बाळासाहेब त्रिभुवन, केतन जालिंदर आढाव, शिवानी संतोष गायकवाड, शिवम चंद्रशेखर वाघ, हर्ष सुभाष जाधव, स्नेहल शिवाजी वहाडणे, अनिकेत ज्ञानेश्वर जऱ्हाड , निखिल सुर्यभान सांगळे, अल्लाबक्क्ष अब्दुल पठाण, प्रतिक संजय साळवे, विक्रम जालिंदर जगताप, सुयश सुनिल कर्जुले, सुधांशू मधुकर पाचोरे, प्रेरणा विलास सांगळे, अक्षय बाळू मोकळ, अजय संजय सुराळकर, शिवराम संजय जगताप, तेजस विकास चव्हाण, सद्गुरू निवृत्ती चिंचपुरे, सागर सुनिल सोनवणे, संध्या नानासाहेब म्हैस, विशाल संतोष शिंदे, ऋतिक प्रविण जगताप, मुजम्मिल यासिन सय्यद, रोहित पांडुरंग जाधव, ऋशिकेश ज्ञानेश्वर मोरे, हरीओम ज्ञानेश्वर देशमुख, मयुरी सुनिल कोते, साजिद सरदार पिंजारी व सुजित सुधाकर डुकरे यांचा समावेश आहे. हे सर्व विध्यार्थी त्यांचा अंतिम वर्षाचा निकाल जाहिर होताच बजाज ऑटो लिमिटेडच्या सेवेत रूजु होणार आहे. ज्या विध्यार्थ्यांना पुढे उच्च शिक्षणासाठी जायचे नाही अशा सर्व विध्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवुन देण्यासाठी प्रयत्न असतो.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे कार्याध्यक्ष श्री. नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, विश्वस्त श्री सुमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले, तसेच निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा श्री. अमित कोल्हे यांनी छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद, विभाग प्रमुख प्रा. साहेबराव दवंगे, प्रा. जी.एन. वट्टमवार, प्रा. गणेश जोर्वेकर, प्रा. प्रविण खटकाळे व प्रा. योगेश जगताप उपस्थित होते.

फोटो ओळीः- संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी संजीवनी पाॅलीटेक्निकच्या बजाज ऑटो लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा छोटेखानी सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र. यावेळा प्राचार्य व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *