
कोपरगाव प्रतिनीधी
(राहुरी फॅक्टरी):-
महाविकास आघाडीच्या कार्यपद्धतीवर आम्ही समाधानी पेक्षा.., जनता समाधानी असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केले.

राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू आज नगर जिल्ह्याच्या खाजगी दौऱ्यावर होते. अहमदनगर येथून श्रीरामपूरला जाताना मंत्री बच्चूभाऊ कडू यांनी देवळाली प्रवरा सोसायटी चौकात माजी सनदी अधिकारी दत्ता पाटील कडू, प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, शहर अध्यक्ष विजय कुमावत, सफाई कामगार संघटना चे वतीने मुन्नाताई चावरे, प्रहार दिव्यांग संघटनेचे शहर अध्यक्ष सलीम शेख आदींनी स्वागत केले. प्रसंगी प्रहारच्या महिला शहर अधक्ष्या भाग्यश्री कदम, उपाध्यक्ष सुरेखा पंडित, उपाध्यक्ष अबिद शेख, शिवाजी मुसमाडे, ओंकार मुसमाडे, शाखा अध्यक्ष अमोल अंबिलवादे, राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष शरद वाळुंज, उपाध्यक्ष एकनाथ वाणी, गणेश भालके, महिला शहर अध्यक्ष रजनी कांबळे, प्रभाकर कांबळे, पुंड दाजी, उपाध्यक्ष अफसाना सय्यद, वंदना कांबळे , प्रशांत कराळे आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीरामपूर येथील कार्यक्रम आटोपून अहमदनगर ला जाताना राहुरी फॅक्टरी येथे पत्रकारांशी संवाद साधताना नामदार कडू बोलत होते.
या प्रसंगी राहुरी फॅक्टरी येथील प्रहार च्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांचा सत्कार केला. व संवाद साधला. तदनंतर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू अहमदनगर कडे रवाना झाले.
