कोपरगाव कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संजय रोहमारे यांचे निधन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाण्याचे माजी संचालक संजय रामराव रोहमारे (वय-५५) यांचे नुकतेच २२ मे २०२२ रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात आई,दोन भाऊ,पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.ते कर्मवीर शंकरराव काळे कारखाण्याचे विद्यमान संचालक सचिन रोहमारे यांचे जेष्ठ बंधू होते.व माजी आ.अशोकराव काळे यांचे विश्वासू सहकारी होते.त्यांच्या निधनाबाबत माजी आमदार अशोकराव काळे,साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दुःख व्यक्त केले आहे.
स्व.संजय रोहमारे हे मितभाषी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात होते. तसेच संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे त्यांनी ५ वर्ष संचालक म्हणून काम केले. आणि कोपरगाव कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे सुध्दा त्यांनी १० वर्षे संचालक पद भुषविले आहे.
ते माजी आ.स्व. दादा पाटील रोहमारे यांचे नातू व पोहेगाव येथील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या स्व.माजी आ.दादासाहेब रोहमारे पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष होते.त्यांच्यावर काल सायंकाळी ०६ वाजता पोहेगाव येथील अमर धाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *