कोपरगांव प्रतिनिधी :- संजीवनी युनिव्हर्सिटी, संजीवनी फार्मसी महाविद्यालय आणि संजीवनी इंजिनिअरींग काॅलेज मधिल एकुण आठ विद्याथ्र्यांची तैवान मधिल विद्यापीठांमध्ये ४ ते ६ महिने कालावधिच्या इंटर्नशिपसाठी (आंतरवासिता) संधी मिळाली. त्यासाठी त्यांना तैवान मधिल विद्यापीठांकडून शिष्यवृत्ती देखील देण्यात आली आहे. संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स विभागाच्या पुढाकारातून या विध्यार्थ्यांना ही संधी मिळाली. आजवर अनेक विध्यार्थ्यांना अशा स्वरूपाची संधी मिळाली आहे.
हे विद्यार्थी तेथिल विद्यापीठांतील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या क्षेत्रातील संशोधन करतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांत संजीवनी युनिव्हर्सिटीच्या कल्याणी रामदास पोपळघट व संकेत सुनिल गायकवाड यांची, संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या प्रथमेश राजेंद्र अंब्रे याची, श्रावणी संजय खडांगळे, गायत्री आप्पासाहेब वक्ते व पुष्कर दिपक मुथ्था यांची, संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या युवराज विजय राजुरे व अंजली चंद्रभान सोनवणे यांचा समावेश आहे.
संजीवनी इंटरनॅशनल विभागाच्या वतीने विदेशातील नामांकित विद्यापिठात विध्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसह इंटर्नशिपची संधी मिळावी यासाठी नियोजनबध्द प्रयत्न केले जातात. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा अडथळा न येता आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व संशोधनाचा अनुभव घेता येतो. आज पर्यंत तैवान, कॅनडा, फिलिपाईन्स, रशिया, ट्युनिसिया , युनायटेड किंगडम, अशा विविध देशातील नामांकित विद्यापीठांत येथील विध्यार्थ्यांना ही संधी मिळाली.
संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री अमित कोल्हे यांनी पालकांसह या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी व्हाईस चांसलर डाॅ. ए.जी.ठाकुर, डाॅ. आर. एस. शेंडगे , डाॅ. आर. ए. कापगते, डाॅ. विपुल पटेल, डाॅ. कविथा राणी, डाॅ. माधुरी जावळे, डाॅ. महेंद्र गवळी व प्रा. प्रेरणा जाधव उपस्थित होते.
चौकट :
संजीवनीच्या अनेक विध्यार्थ्यांना आजवर विविध देशात शिष्यवृत्तीसह इंटर्नशिपची संधी मिळाली. यामुळे त्यांचा वैयक्तिक बायोडेटा मजबुत होणार आहे. संजीवनीचे विद्यार्थी आज जागतिक स्पर्धेत आत्मविश्वासाने उभे राहत असून, आपल्या गुणवत्तेच्या बळावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. या संधीतून त्यांना पुढे या विद्यापिठांमध्ये एमएस सारखी पदवी संपादन करण्याचा मार्ग सुकर होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढेल. तेथील अनुभवातून ऑटोनॉमस दर्जा प्राप्त संजीवनीतील अभ्यासक्रमात काय बदल हवेत याबाबत ते सुचना करू शकतात, कारण आपल्या संस्था ऑटोनॉमस व सुनिव्हर्सिटी असल्यामुळे ते शक्य आहे.-श्री अमित कोल्हे, प्रसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

फोटो ओळीः संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंड श्री अमित कोल्हे यांनी तैवान मधिल विद्यापीठांमध्ये इंटर्नशिप निवड झालेल्या विधार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार केला. सत्कारानंतर टिपलेले छायाचित्र.
