
कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकताच चासनळी येथील गोदावरी नदीपात्रात एका चार ते पांच वर्ष वयाच्या मुलाचा मृतदेह पांढरेशुभ्र वस्रामधे गुंडाळून नदीपात्रात टाकून देण्यात आला होता स्थानिक नागरिकांचा सतर्कतेमुळे हा प्रकार उघड़किस आला. पुलिस यंत्रणा ने तपास करुन तो मृतदेह शवविच्छेदन करुन त्याच्या वडिलांच्या शोध घेवून ताब्यात देण्यात आला सदर मृतदेह चे शवविछेदन केले असून हा मृत्यु कशामुळे झ!ला मृत्यु च नेमके कारण काय अंधश्रद्धा ,अनैतिक सम्बद्धतुन की अजुन काही मुलाची आई शीतल ज्ञानेश्वर बदा दे व ती ज्याच्या सोबत राहत होती तो सागर शिवाजी वाघ दोन्ही सशयित फरार असून ते अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून त्यामुळे मृत्यु कशामुळे झ!ला, मृतदेह नदीपात्रात का फेकून देण्यात आला हे प्रश्न अजुन अनुत्तरित असुन त्याचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता डॉ अशोक गावित्रे यांनी लेखी स्वरुपात कोपरगाँव ग्रामीण पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षण संदीप कोळी यांच्याकडे करण्यास केली असून गुन्हेगारांना योग्य ते शासन करावे व सदर मुलाला न्याय द्यावा ही विनंती त्यांनी केली आहे सदर कुटुंब हे शिर्डी जवळील कोराळे येथे एक महिन्यापासून शेती काम करत होते व त्यांच्या शेत मालकाने माणुसकीच्या नात्यातून त्यांच्या सोबत असणारा मुलगा आजारी असल्याने त्याला शिर्डी येथील साईनाथ रुग्णालयात उपचारासाठी घेवून आले असता तेथील डॉक्टर नी मुलाची तबेत खराब असून पुढील उपचार घेण्यासाठी लोणी येथे जाण्यास सांगितले परंतु सदर कुटुंबाने उपचार घेण्यास नकार दिला व तसेच घरी घेवून गेले काही दिवस त्याला घरी तसेच ठेवले शेत मालकाना सकाळी आम्ही मुलाला घेवून आमचा देवाला जावून येतो सांगितले व तेथून निघुन रात्री उशिरा परत कोराळे येथे रात्री उशिरा परतले तेव्हां त्यांचासोबत मुलगा नव्हता शेत मालकांच्या ही गोष्ट लक्षात आल्यावर त्यांनी मुलगा कुठे आहे विचारल तेव्हां उड़वा उडवी ची उत्तर देण्यास सुरुवात केली मालकानी आधार कार्ड ची मागणी केली असता ते कुटुंब ते तून फरार झ!ले पोलिसांना अनेक सी सी टी वी फुटेज मिळाले असून त्याआधारे तपास सुरु असून पोस्टमार्टम मधे देखिल प्राथमिक अहवालात डोक्याला दुखापत व मेंदूत रक्तस्राव ही कारणे पुढे येत असून घातपात की अजुन काही हे मुलाचे आई शितल ज्ञानेश्वर बदादे व सागर शिवाजी वाघ सापडल्या वर कळेल अगोदर देखिल या प्रकारनाचा अंधश्रद्धा चे दृष्टिकोनातून तपास व्हावा अशी मागणी झ!ली होती
