गुंड मवाली तुमचा कारभार सांभाळता, एकदा आरसा बघा :- विनोद राक्षे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
नुकत्याच काळे गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत नगर परिषदेत तिकीट न मिळालेल्या एका असंतुष्ट कार्यकर्त्याने कोल्हे गटावर टीका करताना स्वामी समर्थ सभा मंडप प्रसंगी झालेल्या घटनेवेळी नगरसेवकांना गुंड मवाली असा उपरोधिक भाष्य करण्याचा प्रयत्न केला. त्याला उत्तर देताना कोल्हे गटाने तुफान हल्लाबोल केला आहे.आ.काळे यांचे सर्व कारभार बघतो,ज्याला शासकीय गुन्ह्यात अटक होऊन कोठडी मिळाली होती अशा काळे गटाने जनतेतून निवडून आलेल्या नगरसेवकांना गुंडमवाली म्हणण्याची भाषा करणे म्हणजे स्वतःच्या नाकाला घाण आणि रुमाल दुसऱ्याच्या नाकाला लावून आरोप केल्यासारखे आहे अशी जळजळीत टीका विनोद राक्षे यांनी विरोधकांवर केली आहे.
जर हिशोब लावायचा असेल तर आमचे कार्यकर्ते भर चौकात गोळीबार करत नाही, रेशन घोटाळ्यात कोणाचे कार्यकर्ते? वेगवेगळ्या गैरप्रकारात कोणाच्या कार्यकर्त्यांचे प्रथम यादीत नाव ? पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत कुणाची मजल गेली होती हे सगळं पुन्हा उजाळा करायला लावू नका अन्यथा अनेक पितळ उघडे पडतील असा इशाराही राक्षे यांनी दिला आहे.

जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणारे यांना त्यांच्या पक्षाने योग्य उत्तर नगरपरिषद निवडणुकीत दिले आहे. स्वीकृत नगरसेवक न केल्याची खंत त्यांच्या मनात असल्यामुळे ते कॅमेऱ्यासमोर येऊन नेत्यांना नजरे येण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या पक्षाने आम्हाला तिकीट देऊन आमची योग्यता सिद्ध केली दुर्दैवाने तुम्हाला तुमच्या पक्षाने तिकीटा योग्य देखील समजले नाही याचे भान ठेवत आरोप करण्याचा प्रांजळ सल्ला देखील राक्षे यांनी टीकाकारांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *