खेलो इंडिया राष्ट्रीय योगासन स्पर्धेत पुणे विद्यापीठाला ऐतिहासिक सुवर्णपदक…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनीधी:-
जैन विद्यापीठ बंगलोर (कर्नाटक) येथे दिनांक २३ एप्रिल ते ४ मे २०२२ या कालावधीमध्ये पार पडलेल्या दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेत प्रथमच योगासन या क्रीडा प्रकारचा समावेश करण्यात आला होता आणि पहिल्याच वर्षी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलीच्या सघांने ६०० पैकी ५०० गुण मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले, नागपूर विद्यापीठाला रौप्य तर हरियाणा येथील गुरु जम्भेश्वर विद्यापीठाला कांस्य पदक मिळाले. संघव्यवस्थापक डॉ. नामदेव फटांगरे यांनी सांगितले कि विजयश्री मिळविणे कठीण काम होते. खूप अटीतटीचे सामने झाले. सेमी फायनल मध्ये सहाव्या क्रमांकावरून दुसरा क्रमांक मिळवत फायनल मध्ये पोहोचलो आणि फायनल मध्ये स्थिरम सुखम आसनमः या परंपरेने मुलींनी उत्कृष्ट योगासनांचे सादरीकरण केले. यासाठी कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे सरावामध्ये सातत्य ठेवणे हे मोठे दिव्य काम होते, सर्व खेळाडूंच्या सराव सत्रावर लक्ष्य होते. मुलांच्या वैयक्तिक व अकॅडमी सराव सत्र व मार्गदर्शन यामुळे खेलो इंडियाची विजयश्री खेचून आणता आली. मुलींच्या संघातील सहभागी खेळाडू पुढील प्रमाणे:- कु. आकांक्षा खराडे (गरवारे कॉलेज, पुणे), कु. सानिका केळकर (एम.एम.सी.ओ.ई. पुणे), कु.जोसना डमढेरे ( एम एम.सी.सी.पुणे), कु. श्रेया कंधारे (राजमाता जि.क.वा.वि. कॉलेज भोसरी), कु. स्नेहा काळे (इंदिरा कॉलेज ताथवडे पुणे) आणि कु.प्रगती देशमुख (वणी कॉलेज, नाशिक). संघव्यवस्थापक व मार्गदर्शक म्हणून डॉ. नामदेव फटांगरे (शारीरिक शिक्षण संचालक, व्ही.आय.आय.टी. कॉलेज पुणे) आणि प्रा. रवींद्र चव्हाण (वणी कॉलेज नाशिक) यांनी उत्तम कामगिरी पार पाडली. या ऐतिहासिक आणि सुवर्ण कामगिरीबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर, क्रीडामंडळ विभाग प्रमुख व क्रीडा संचालक डॉ. दीपक माने सर, क्रीडा विभागाचे सर्व पदाधिकारी यांनी सर्व विजयी खेळाडू, संघव्यवस्थापक मार्गदर्शक यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *