राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणीमध्ये महाविद्यालयांची भूमिका महत्त्वाची:- डॉ.एस.पी.लवांडे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
स्थानिक के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय , कोपरगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय महाविद्यालय अध्यापक संघटना स्थानिक शाखा, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ मार्च रोजी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि महाविद्यालयांची भूमिका ” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणुन डॉ. एस. पी. लवांडे (अध्यक्ष, महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ) हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. त्यांनी आपल्या उद्घाटन मनोगतात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याविषयी अभ्यासपुर्ण विचार व्यक्त करतांना शिक्षा व्यवस्थेत होणारे बदल व अध्यापकांची भूमिका तसेच जबाबदारी नमुद केली. प्रो. (डॉ.) के. एल. गिरमकर (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राध्यापक संघटना) यांनी विविध शैक्षणिक आयोगाची माहिती व बदलती शैक्षणिक धोरणे यावर भाष्य करतांना महाविद्यालयांची भूमिका व वर्तमान शिक्षा प्रणालीचे गुण-दोष या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. एस पी. लवांडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यावर विस्तृत मार्गदर्शन करतांना शिक्षण व्यवस्थेत कालानुरूप होणारे बदल व या बदलाला सामोरे जाण्यासाठी करावयाची उपाय-योजना यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोपात डॉ. रविंद्र जाधव (अध्यक्ष, स्थानिक शाखा) यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजुन सांगताना या धोरणातील उणीवा स्पष्टपणे मांडल्या.

यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यशाळेच्या प्रारंभी स्थानिक शाखेचे सचिव डॉ. गणेश शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश्य स्पष्ट केला. उपस्थित मान्यवरांचा परिचय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. विजय ठाणगे यांनी करून दिला. या कार्यशाळेसाठी को. ता. एज्यू. सोसायटीचे विश्वस्त मा. संदिपराव रोहमारे, डॉ. प्रदीप मुटकुळे, डॉ. प्रकाश वाळुंज, डॉ.बी.आर.पवार, प्रा.पालवे, प्रा.नजन हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्थानिक शाखेच्या वतीने अध्यापक संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा व महाविद्यालयातील विशेष कामगिरी केलेल्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रो.जे.एस.मोरे यांनी तर आभार डॉ.एम.बी.खोसे यांनी मानले. या कार्यशाळेसाठी आयोजक महाविद्यालयाबरोबरच जिल्हातील अनेक महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *