
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव ते झगडे फाटा या रस्त्यावर गुरसळ वस्ती नजीक कोपरगाव कडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने एक प्रवासी वाहतूक करणाऱ्या अपे रिक्षाला जोराची धकड दिल्याने यातील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे तर ६ प्रवासी गंभीर जखमी आहे.

सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव कडून भरधाव वेगाने एक मालवाहूतुक कंटेनर PB ०५ AB ४००६ ने झगडे फाटा चौफुलीकडून येणाऱ्या एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या अपे रिक्षा MH १७ AJ ९०५६ ला समोरासमोर धडक दिल्याची घटना शुक्रवार दि 6 मे रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली असून ही धडक इतकी जोराची होती की या धडकेमध्ये चार महिला व दोन पुरुषाचा जागीच मृत्यू झाला असून यात यात रंजनाबाई साहेबराव खरात वय वर्ष ६० रा चांदेकसारे, शैला शिवाजी खरात वय वर्ष ४२ रा श्रीरामपूर, पूजा नानासाहेब गायकवाड वय वर्ष २० रा हिंगणवेडे, प्रगती मधुकर होन वय वर्ष २० रा चांदेकसारे प्रवाशांमध्ये शिवाजी मारुती खरात वय वर्ष ५२ रा श्रीरामपूर तर आत्माराम जमानासा नाकोडे वय वर्ष ६५ रा वावी या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे.


सहा रूग्ण संत जर्नादन हाँस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.तर उपचारा दरम्यान. रुपाली सागर राठोड वय ४० रा.सिन्नर या रुग्णाचा मृत्यू झाल्याची वृत्त समोर येत आहे.डाऊच येथे भीषण अपघात झाले असे माहिती त्वरित अपघात स्थळी ॲम्बुलन्स तातडीने पाठवून अति गंभीर अवस्थेतील रुग्ण जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथे तातडीने ॲम्बुलन्स ने आणण्यात आले, रुग्ण आल्यानंतर उपचार सुरू झाले.उपस्थित सर्व डॉक्टर्स सर्व नर्सिंग स्टाफ कर्मचाऱ्यांचे अति तातडीने सुविधा दिल्याबद्दल उपस्थित सर्व नातेवाईक व प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या लोकांकडून कौतुक केले जात आहे.


कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक वासुदेव देसले यांना माहिती मिळताच त्यांनी अपघात स्थळी तातडीने पोहचुन अपघात ग्रस्तांना त्वरित मदत केली आहे.पोलिस निरिक्षक वासुदेव देसले, पोलिस उपनिरिक्षक ठोबरे यांच्यासह शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांनी अपघात ग्रस्तांना तातडीने मदत केल्यामुळे नागरिकांनी आभार मानले आहे.
