बस चालू न झाल्याने ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे ही बाब दुदैवी आहे:-श्री.विवेकभैय्या कोल्हे…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
तालूक्यातील डाऊच परिसरांत शुक्रवारी अपे रिक्षा आणि कंटेनर यांच्या दुर्दैवी अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थीनीसह सात व्यक्तींचा मृत्यु झाला त्यांना श्रद्धांजली अर्पण करून कोपरगाव आगार प्रमुखांनी तात्काळ ग्रामीण भागातील बससेवा सुरू न केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, कुणा लोक प्रतिनिधींच्या सांगण्यावरून बस चालू होण्यांचे श्रेय कोल्हेंना जाऊ नये म्हणून तर बस सुरू होत नाही ना? असा खोचक सवाल जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी करत आगारप्रमुख अभिजित चौधरी यांना बससेवा चालू करा या मागणीचे निवेदन दिले.
2मे रोजी तहसील प्रशासनास बसबाबतचे जन आक्रोश आंदोलनात निवेदन देऊनही त्यांनी ते हाकेच्या अंतरावर असलेल्या आगारप्रमुखांना दिले नाही याबाबती शंका उपस्थीत केली.
श्री विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, बस चालू न झाल्याने ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे ही बाब दुदैवी आहे. माजी परीवहनमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे कार्यकाळात ९० च्या पुढे बस मुक्कामी असायच्या आता मात्र त्याची संख्या अवघ्या ६५ वर झाली असुन ग्रामीण भागातून सकाळी तालुक्याच्या ठिकाणी दळणवळणासाठी एस.टी महामंडळाच्या बसेसची संख्या वाढवावी असेही विवेक कोल्हे म्हणाले.
याप्रसंगी श्री परागजी संधान, श्री साहेबराव रोहम, श्री अविनाशजी पाठक, श्री वैभवराव आढाव, श्री स्वप्निलजी निखाडे, श्री किरणजी सुपेकर, श्री सचिनजी सावंत, श्री चंद्रकांत वाघमारे, श्री जगदीशजी मोरे, श्री रोहनजी दरपेल, श्री अर्जुन माकोणे, श्री रवींद्रजी लचुरे, श्री निलेशजी बोर्हाडे, श्री सतिशराव केकाण,श्री संकेतजी केकाण, श्री गोपीनाथजी गायकवाड, श्री वासुदेवजी शिन्दे, श्री आकाशजी खैरे, श्री सागरजी राऊत, श्री महेंद्रजी नाईकवाडे, श्री यशजी सुर्यवंशी, श्री अनिलजी गायकवाड, श्री रोहितजी कनगरे, श्री विजयजी चव्हाणके,श्री समीरजी सुपेकर, श्री किरणजी आव्हाड, श्री सुनिलजी पांडे, श्री जुबेरजी खाटीक, श्री अकीलजी मेहंदी, श्री अल्ताफभाई पठाण, श्री वैभवजी सोळसे, श्री किरणजी कच्छी, श्री विशालजी पवार, श्री रुपेशजी सिनगर, श्री दादासाहेब नाईकवाडे, श्री सुमितजी डोखे,श्री निखिलजी शेजवळ, श्री सनीजी रिळ, श्री योगेशजी पवार, श्री अशिषजी शिन्दे, श्री अमोलजी जगताप, श्री रमेशजी मरसाळे,श्री राजेंद्रजी मरसाळे, श्री मंगेशजी मरसाळे, श्री साहिलजी सोनवणे, श्री अर्जुनजी मोरे, श्री अकेशजी मोरे, श्री जीवनजी जावरे,श्री किशोरजी जावरे, श्री आकाशजी कोपरे, श्री अनिलजी जाधव, श्री दत्तात्रेय कोळपकर, श्री करीमभाई शेख, श्री जुनेरभाई शेख, श्री इब्राहिमभाई शेख, श्री भिमराजजी संवत्सरकर, श्री किरणजी आढाव,श्री शामजी सुपेकर इ. मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *