
कोपरगाव प्रतिनिधी:-
महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे येथे आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण विविध मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी पार पडले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले मंडळाचे अध्यक्ष प्रदीप नवले होते.त्यांनी आपले विचार मांडताना महात्मा ज्योतिबा फुले यांनी बहुजन शिक्षणासाठी केलेल्या क्रांतीची आठवण करून दिली व आजच्या काळात स्पर्धेचे युग आहे त्यामुळे विविध कलागुणांना वाव देण्यासाठी अशा स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य ठरणार आहे.
या वेळी पुढे श्री संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद काळे यांनी आपले विचार मांडतांना सामाजिक ऐक्य व शिक्षणाचा आग्रह महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी धरला त्यामुळे आज सर्वत्र आपण शिक्षणाची एवढी क्रांती झालेली बघतो आहे.अतिशय प्रतिकूल वातावरणात शिक्षण घेऊन नावलौकिक करणारे विद्यार्थी आपल्या ग्रामीण भागात आहे त्यांना कौतुकाची थाप देऊन व योग्य व्यासपीठ देऊन पुढे आणणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.धोत्रे शाळेच्या माध्यमातून अनेक गुणवान विद्यार्थी आजवर घडले आहेत व पुढेही नावलौकिक करतील यात शंका नाही असे काळे म्हणाले.

या प्रसंगी श्री संत सावता माळी युवक संघ कोपरगाव अध्यक्ष अशोक माळवदे कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना
क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक देविका संतोष घोंगाणे व प्रसाद शरद पोटे,द्वितीय क्रमांक अजिंक्य दिनेश जाधव, तृतीय क्रमांक साई सुदाम पवार तसेच सहभागी विद्यार्थी आदिती आंण्णासाहेब पगारे,वैष्णवी दादासाहेब रोकडे,वैष्णवी संतोष घोंघाने,तृप्ती नंदकीशोर जामदार,दिव्या सुधाकर चव्हाण,ॠतुजा पवार,कोमल दिलीप गागरे,सोनाली साईनाथ शेवाळे,रुद्ध सुनिल साखरे,साक्षी रमेश पाडेकर,वैष्णवी संदीप चव्हाण,भावना विजय चंदणे,प्रिती पाडेकर,योगिता अनिल देवकर,व सुश्मिता ज्ञानेश्वर चव्हाण आदीना सन्मान पत्र व ट्राफी देऊन गौरविण्यात आले तसेच संतोष रांधव (उपाध्यक्ष)
डाॅ.मनोज भुजबळ (कार्यअध्यक्ष)
योगेश ससाणे (सचिव)
संदीप डोखे (संपर्क प्रमुख)
अनंत वाकचौरे (खजिनदार)
शेखर बोरावके (कोपरगाव शहरध्यक्ष)
मनोज चोपडे (शहर उपाध्यक्ष)पोलीस पाटील देवेश माळवदे,संजय जामदार,सुनील मंडलिक,सुनील माळवदे,संदीप भाटे,मुख्याध्यापक सोनवणे सर,करडे सर आदींसह विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
