“शिर्डी व कोपरगाव पोलीस अधिकाऱ्यांच्या सामाजिक सलोख्याचा राज्याने आदर्श घ्यावा”:- अँड.नितीन पोळ…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
“शिर्डी व कोपरगाव पोलीस अधिकाऱ्यांच्या सामाजिक सलोख्याचा राज्याने आदर्श घ्यावा”
मस्जिद वरील भोंगे व हनुमान चालीसाच्या वादाने संपूर्ण राज्य ढवळून निघाले असताना शिर्डी उपविभागीय अधिकारी व कोपरगाव शहर व तालुका पोलीस स्टेशन चे अधिकारी यांनी सामाजिक सलोखा राखून कोणतेही वाद टोकास जाऊ दिले नाही याचा संपूर्ण राज्याने आदर्श घ्यावा असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी केले
संपूर्ण राज्यात मस्जिद वरील भोंगे व हनुमान चालीसा या वरून राजकीय लोकांनी धार्मिक व सामाजिक वातावरण ढवळून गेले
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मस्जिद वरील भोंगे काढावे व काढले नाही तर मस्जिद समोर हनुमान चालीसा लावली जाईल अशी भूमिका घेतली होती त्यामुळे सामाजिक वातावरण ढवळून निघाले कधी काय होईल दंगली उसळतील अशी परिस्थिती निर्माण झाली असताना शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधीक्षक संजयजी सातव यांच्या नेतृत्वाखाली हिंदू मुस्लिम समाजातील लोकांसोबत चर्चा करून सामाजिक सलोखा राखण्याचे काम केले व कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली असून कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले साहेब व ग्रामीण पोलीस स्टेशन चे दौलत राव जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसह विशेष परिश्रम घेऊन सामाजिक सलोखा कायम ठेवून या बिकट परिस्थितीतून वाट काढली त्या बद्दल या पोलीस अधिकारी यांचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच असून शिर्डी व कोपरगाव पोलीस स्टेशन च्या अधिकाऱ्यांचे हे काम संपूर्ण राज्यांनी आदर्श घ्यावे असेच आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *