देव-देवतांची मंदिरे अध्यात्म ऊर्जेचे स्थान:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

Uncategorized




कोपरगाव प्रतिनिधी:-
देव-देवतांची मंदिरे अध्यात्म ऊर्जेचे स्थान असून त्यातून संस्कार चेतना प्राप्त होत असते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
तालुक्यातील घारी हद्दीतील श्री जगन्नाथ भगवान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री चिन्मयानंद स्वामी,श्री.श्री.१००८ स्वामी पूर्णानंदजी चैतन्यजी महाराज,प.पूज्य १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवानंदगिरीजी महाराज,ब्रम्हगिरी चैतन्य महाराज,साध्वी अनन्या स्वामी,गोवर्धनगिरी महाराज आदींच्या उपस्थितीत पार पडला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.


सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते विधीवत मंत्रोच्चारात फित कापून या सोहळ्याचे लोकार्पण करण्यात आले. घारी गावाला प्राचीन कालीन ऐतिहासिक महत्त्व आहे. धार्मिक व प्रफुल्लित असे निसर्गरम्य वातावरणात या मंदिराची उभारणी झालेली असून पंचक्रोशीतील भाविकांना यातून अध्यात्म स्फूर्ती निश्चित मिळेल असेही त्या म्हणाल्या.
या प्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष, संचालक अरुण येवले, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात अशोक पवार,राजेंद्र देशमुख, आयुश गवळी,रामनाथ डुबे,गंगाधर पवार,आप्पासाहेब कोल्हे,प्रकाश इनामके,जयदत्त होन,विजय रोहोम,सागर पवार यांच्यासह घारी पंचक्रोशीतील भाविक विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *