
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने दि.१९ फेब्रुवारी ते दि.२७ फेब्रुवारी दरम्यान “स्वराज्य सप्ताह” साजरा केला जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी दिली आहे.
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक जिल्हाध्यक्ष अॅड.पगार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन येथे संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार दिलीपराव बनकर, आमदार पंकजभाऊ भुजबळ, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, जेष्ठ नेते गणपत पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने तालुकापातळीवर छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संत गाडगेबाबा जयंती व मराठी भाषा दिन यांच्या निमित्ताने दि.१९ फेब्रुवारी ते दि.२७ फेब्रुवारी दरम्यान “स्वराज्य सप्ताह” साजरा करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ‘किल्ले हरिश्चंद्र गड’ व “किल्ले साल्हेर” या किल्ल्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. स्वराज्य सप्ताहात भव्य शिवजयंती सोहळा, सेल्फी विथ किल्ला, ‘ शिवरायांचे राज्य-बहुजनांचे राज्य-रयतेचे राज्य’ व ‘सबका राजा-शिवाजी राजा’ या संकल्पनेवर व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. ‘राजमाता जिजाऊंचा शिवबा’ या विषयावर रांगोळी स्पर्धा, बाल शिवाजी यांच्या रुपात मुलांची वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. “रयतेचे राज्य” शिवरायांचे या विषयावर वकृत्व व निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आ.पंकजभाऊ भुजबळ यांनी याबैठकीप्रसंगी बोलतांना केले.
राज्यातील महायुती सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे असे आवाहन आ.दिलीपराव बनकर यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राजेंद्र डोखळे, यशवंत शिरसाट, विजय पाटील, रघूनाथ आहेर, दीपक गोगड, राजेंद्र उफाडे, साहेबराव मढवई, दीपक लोणारी, राजेंद्र पवार, रामदास गवळी, गोकुळ देवरे, संतोष शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विवध फ्रंटल व सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, पुजा आहेर, विजय पवार, सुजित सोनवणे, सुयोग अहिरे, दयानेश्वर दराडे, रामेश्वर साबळे, विश्वासराव देशमुख, अश्विनी मोगल,सिद्धार्थ वनारसे, मेघा दराडे, सुभाष होळकर, संगिता राउत, भूषण धनवटे, प्रतीक्षा तुपसुंदर, सुनिल कबाडे, रंगनाथ थोरात, वैभवी रेघाते,सुनिता राजोळे,निर्मला सावंत, माधुरी एरवंडे, जयश्री मगर, नितीन भामरे, बाळासाहेब माळवे, आदित्य पगार, गणेश तिडके, हबीब शेख, संदीप वाघ, कृष्णा अहिरे,भगवान बागुल, प्रशांत महाजन, रविंद्र ठाकरे, दिगंबर सोनवणे, संजय महाले, दुर्गेश चितोडे, रामराव मोगल, अनिल बोरस्ते, संजय महाले,अरुण बोरस्ते, शाखीत शेख, तेजस अहिरे, संजय केदार, संजय मोरे, गोरख जाधव, अकीफ खान, गौरव जाधव, कृष्णा मातेरे, दशरथ ठाकरे, हिरामण गावित, हेमंत मगर, महेश कुटे,जीवन वाघ, मनोज पांडव, निवृत्ती साबळे, सुरज गवळी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो ओळी : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत बोलतांना जिल्हाध्यक्ष रविंद्रनाना पगार.
समवेत आ.पंकज भुजबळ, आ.दिलीप बनकर, दिलीप खैरे, गणपत पाटील आदी दिसत आहेत.
