भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांची कोपरगांव पोलिस ठाण्यास भेट…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:–
तत्कालीन मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगांव शहर पोलिस ठाणे इमारतीस ३ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी दिल्याने हे काम पूर्णत्वास आले आणि शहराच्या वैभवात यामुळे भर पडली असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.
कोपरगांव शहर पोलिस ठाणे इमारतीचे काम पूर्ण झाले त्यानिमीत्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मंगळवारी भेट देवून पाहणी केली त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी स्वागत करून सौ. कोल्हे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी गटनेते रविंद्र पाठक, रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, राहुल सुर्यवंशी, विवेक सोनवणे, भाजपाचे शहराध्यक्ष दत्ता काले, बबलु वाणी, वैभव गिरमे, अल्ताफ कुरेशी, गोपी गायकवाड, खालीकभाई कुरेशी, संदिप देवकर, फकिर महंमद पहिलवान सुपेकर यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी नगरसेवक, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे आणि संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी शहर आणि ग्रामिण पोलिस ठाण्यासह इमारत कामाचा मोठया प्रमाणांत पाठपुरावा केला. तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोलिस ठाणे इमारत नुतणीकरणासाठी आवश्यक तो प्रस्ताव दाखल करून त्यासाठी ३ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी मिळविला. जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री प्रा राम शिंदे यांनीही याकामी मोलाची साथ दिली. उर्वरित विविध इमारत, वाचनालय इमारत कामे करण्यासाठी सौ स्नेहलता कोल्हे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे.हया इमारत कामामुळे शहराचे वैभव आणखी वाढले आहे. शेवटी गटनेते रविंद्र पाठक यांनी आभार मानले.

फोटोओळी:- कोपरगांव दि. ३ मे २०२२ (वार्ताहर) कोपरगांव शहर पोलिस ठाणे इमारतीसाठी तत्कालीन शासनाने ३ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी देवुन हे काम मार्गी लागले त्यानिमीत्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी भेट देवुन पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *