

कोपरगांव प्रतिनिधी:-
रमजान उपवासातुन मनाच्या एकाग्रतेबरोबरच प्रार्थनेला विशेष महत्व आहे, मुस्लीम बांधवांसाठी हा पवित्र महिना असुन गेल्या महिनाभरात त्यांच्यासह अबाल वृध्दांनी केलेले उपवास निश्चितच सर्व समाजाच्या भल्यासाठी प्रेरणा देणारे ठरतील असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. एकता आणि अखंडतेची शिकवण सर्वांनी आत्मसात करावी असेही त्या म्हणाल्या. कोपरगांव शहर व तालुका भाजपा तसेच संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने रमजान ईद निमीत्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता
कोल्हे यांनी मुस्लीम बांधवांची व्यक्तीगत भेट घेवुन त्यांना शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अक्षय तृतीया निमित्त हिंदू बांधवांनाही त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी गटनेते रविंद्र पाठक यांनी प्रास्तविक केले. याप्रसंगी मौलाना शेख, हाजी सद्दामभाई सय्यद, रियाज शेख, लकीरभाई सच्यद, रहिमभाई शेख अहमदभाई बेकरीवाले, मन्सुरभाई शेख, अकबरलाला शेख, निसार शेख, अन्सार शेख, अकिब शेख, नदिम मन्सुरी, अॅड दारूवाला, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, रिपाई आठवले गटाचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, राहुल सुर्यवंशी, विवेक सोनवणे, बबलु वाणी, वैभव गिरमे गोपि गायकवाड, संदिप देवकर फकिरमहंमद पहिलवान, खालीकभाई कुरेशी यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, यंदा उष्णतामान प्रचंड होते त्यामुळे रमजानचा रोजा ठेवतांना अनेकांना कसरत करावी लागली. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मुस्लीम बांधवांच्या उन्नत्तीसाठी सातत्याने प्रयत्न करून त्यांच्या प्रत्येक अडी अडचणींत मोलाची साथ दिली. संजीवनी उद्योग समुह शहरवासियांच्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम धावून आलेला आहे. मानवाच्या प्रत्येक अडचणीत पुढे कसे जायचे याची शिकवण कुराण पवित्र ग्रंथातुन मिळत असते तर हिंदु बांधवासाठी गीता सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचेही त्या म्हणाल्या. शेवटी माजी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी यांनी आभार मानले.




फोटोओळी:- कोपरगांव
रमजान ईद निमीत्त भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
