श्री.साईबाबा संस्थान, शिर्डीची मा.व्यवस्थापन समितीची सभा नामदार मा.श्री.आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ मार्च रोजी पार पडली…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री साईबाबा संस्थान, शिर्डीची मा.व्यवस्थापन समितीची सभा नामदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ मार्च रोजी पार पडली.
यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे माजी उपाध्यक्ष व माजी मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीत श्री रामनवमी उत्सवासाठी ९५ लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली व त्यातून २१ लक्ष रुपये निधी ग्रामस्थांच्या मागणीनुसार रामनवमीचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी देण्यात येणार आहेत. लाडू स्पर्धा घेऊन त्यातील उत्कृष्ट लाडु निवडून त्याप्रमाणे प्रसाद लाडूमध्ये बदल करण्यात येईल, दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बायोमेट्रिक पासची सक्ती रद्द करण्यात येईल, १ एप्रिल २०२२ पासून द्वारावती गार्डनमध्ये सत्यनारायण पूजा व अभिषेक पूजा सुरू करण्यात येईल, पाणीपुरवठा तलावाच्या ठिकाणचा वॉकिंग ट्रॅक पुन्हा सुरू करण्यात येईल, प्रसादासाठी शुद्ध तूप खरेदी करण्यासाठी सुधारित प्रक्रिया राबवण्यात येईल, नियमित व योग्य पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना अटींप्रमाणे पेमेंट देण्यात येईल आदी महत्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.

यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री. जगदीशजी सावंत, विश्वस्त मा.आ.श्री. जयवंतरावजी जाधव, मा.श्री. एकनाथजी गोंदकर, मा.श्री.सुहासजी आहेर, मा.श्री. अविनाशजी दंडवते, मा.श्री. सचिनजी गुजर, मा.श्री. सुरेशजी वाबळे, कु. अनुराधाताई आदिक (व्ही.सी. द्वारे), मा.श्री. महेंद्रजी शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी मा. भाग्यश्रीताई बाणायत आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *