५ नंबर साठवण तलावाला १३१ कोटी रुपये मिळवून दिल्याबद्दल माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नामदार.आशुतोषदादा काळे व कोपरगावातील सर्व क्षेत्रातील प्रशासनाचे आभार मानले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
जल है तो जीवन है दि.२५ मार्च रोजी १३१ कोटी रुपये, येसगाव येथील ५ नंबर साठवण तळ्याच्या कामा साठी मिळाले, मंजूर झाले. आत्ता टेंडर होईल व काम चालू होईल…..हे सर्व केवळ ज्या सर्वांनी या आंदोलनात कळत न कळत सहकार्य केले ,व वेगवेगळ्या मार्गाने विशेष केले.


” कोपरगाव पाणी संघर्ष समिती “
या सर्व सदस्यांचे खऱ्या अर्थाने योगदान लाभले व मिळाले…कोपरगाव च्या इतिहासात या आंदोलनाला प्रथम समाज निहाय पक्ष विरहित लोक पुढे आले , वेगवेगळ्या संघटना , ( वकील संघ ) सामाजिक कार्यकर्ते , विशेष करून महिला भगिनीनी स्वयंस्फुर्तीने पुढे येऊन पाठिंबा दिला….कोपरगाव तालुका मराठी पत्रकार संघटना सह इतर पत्रकार संघटनेने ही कोपरगाव च्या इतिहासात पहिल्यादा या पाण्याच्या आंदोलनाला ला पाठींबा दिला होता . शेवट पर्यंत हा लढा चालू राहिला…
शेवटी ४ वर्षा नंतर यश आले…हा लढा , आंदोलन हे आपण सर्वांनी आपल्या साठीच , आपल्या गावासाठी , पुढच्या पिढी साठी , घरच्या माताभगिनीं साठी केले / करायला भाग पाडले.आसो
सर्वांच्या मुळे हा प्रश्न मार्गी लागला… यात ज्या व्यक्तींनी सहकार्य केले त्यांचे आभार.
तसेच मा. नामदार.आशुतोष दादा काळे साहेब यांचे विशेष आभार
त्यांनी आपल्या/ जनतेच्या मागणी प्रमाणे पाठ पुरवठा केला व पाणीप्रश्न तडीस नेला व पैसे मंजूर करून आणले..
फक्त आणि फक्त आपल्या साठी, आपल्याला पिण्याचे पाणी मिळण्याच्या साठी हा लढा होता. उभारावा लागला. सर्वांचे आभार / अभिनंदन
तसेच नगराध्यक्ष , नगरपालिका प्रशासन , प्रांत , तहसीलदार , पोलीस प्रशासन , महाराष्ट्र शासन , विशेष करून कोपरगाव चे सर्वे सनमाननीय.पत्रकार बंधू चे विशेष करून आभार , त्यांच्या सहकार्या शिवाय हे शक्य नव्हते
आपले,,
२६/३/२०२२
माजी.नगराध्यक्ष. मंगेश पाटील
व कोपरगाव पाणी संघर्ष समिती चे सर्वे सदस्य………

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *