स्व.लोहाटे महाराजांना शेवटचा “जय हरी” :- नारायणशेठ अग्रवाल…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगावातील प्रसिद्ध में. रमणलाल मदनलाल काले यांच्या फर्म मधील कर्मचारी म्हणून स्व.कीर्तनकार व प्रवचनकार हरिभक्त पारायण विठ्ठलराव लोहाटे महाराज हे बरेच दिवस कार्यरत होते.
स्वतः वाचनाची आवड,परमेश्वराचा ध्यास व हरिनामाची ओढ यामुळे ते आपो-आपच परमाथाकडे वळले गेले.
आपली जुनी ओळख पुसून कोपरगाव पंचक्रोशीत नाही……तर उभ्या महाराष्ट्रात कीर्तनकार व प्रवचनकार म्हणून प्रसिद्ध झाले.
यात्रेहून परतताना नाशिक येथे अस्वस्थ वाटू लागले त्यांना नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले तेथे त्यांची प्राणज्योत मावली यात्रेवरून परत येताना त्यांना देवाज्ञा झाली.
हा त्यांचा पुण्यकर्माचाच एक भाग आहे.
आपल्या अमोघ वाणीतून त्यांनी मोठ-मोठी कीर्तने व प्रवचने गाजवली विविध उदाहरणे देऊन सोप्या भाषेत हरिनाम समजून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता, मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने त्यांनी केलेले साई प्रवचन सर्वांनाच आवडले.
कोपरगाव शहराचे भूषण स्व.लोहाटे महाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदाय व कोपरगावातील धार्मिक कार्यास पोकळी निर्माण झाली आहे. दहाव्याला होणाऱ्या कीर्तनातून त्यांनी बरेच समाज प्रबोधन केले गोरगरीब लोकांच्या दहाव्याला ते नि:शुल्क प्रवचन करीत
तीर्थ क्षेत्राच्या विविध यात्रेतून त्यांनी कोपरगावकरांना सहली काढून दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. त्यायोगे अनेक गरिबांना तीर्थयात्रेचा लाभ घेता आला एवढे असूनही साधा पाय-जमा शर्ट व टोपी असा सर्वसामान्यांचा वेश परिधान करत त्यामुळे सर्वांना आपल्यासे वाटत आशा एक परोपकारी परमेश्वराची देण लाभलेल्या स्व.लोहाटे महाराजांना माझ्या अग्रवाल कुटुंबाच्या वतीने व शहराच्या वतीने व्यापाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली..!
आपला-नारायणशेठ अग्रवाल.
मो. 9822630330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *