सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साहेबांनी दाखवीलेल्या मार्गाने चालणे हीच साहेबांना श्रद्धांजली ठरेल:-माजी मंत्री बबनराव घोलप…

Uncategorized

शंकरराव कोल्हेच्या दशक्रिया विधी निमित्ताने घोलप यांचे कडुन कुटुंबाचे सांत्वन…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगावचे भाग्यविधाते सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या दशक्रिया विधी निमित्ताने राज्याचे माजी समाजकल्याण मंत्री शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी कोल्हे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले
यावेळी श्रद्धांजली वाहताना घोलप यांनी सांगितले की साहेबां बरोबर विधानसभेत पंचविस वर्ष काम करण्याची संधी मिळाली त्यांची सर्वांबरोबर काम करण्याची पद्धत लकब उल्लेखनीय होती अनेकांच्या जिवनात परिवर्तन घडविण्याचे काम कोल्हे साहेबांनी केले अत्यंत शिस्तप्रिय व आदर्श नेत्याला महाराष्ट्र मुकल्याने मोठी हानी झाली असल्याचे सांगुन त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालत कोल्हे कुटूंबियांनी व सर्वानी समाजसेवा अविरतपणे सुरु ठेवावी हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे सांगत त्यांच्या काळातील विधानभवनातील अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला कोल्हे कुटुंबातील सर्वांना साईबाबा दुःखातून सावरण्यासाठी शक्ती देवो अशा भावना घोलप यांनी व्यक्त केल्या यावेळी माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे, नितीनदादा कोल्हे,बिपिनदादा कोल्हे ,विवेक भैय्या कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे यांचे सह कुटुंबातील सर्वांची भेट घेतली व सांत्वन केले
यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा भा ज पा गटनेते रविंद्र पाठक ,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे विभागीय अध्यक्ष दिलीपराव कानडे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,दत्ता दुशिंग, संजय सरवार,गणेश कानडे , सतिष कानडे, माधव पोटेसर, एम डी कानडे,वसंतराव थोरात आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *