

कोपरगाव प्रतिनिधी:-
संवत्सर परिसरातील 3 स्वस्त धान्य अंतर्गत 1876 लाभार्थ्यांना दिवाळसणानिमीत्त शिंदे-फडणवीस शासनाने दिलेल्या आनंद शिधाचे वाटप कारखान्याचे विद्यमान संचालक श्री ज्ञानेश्वर बापू परजणे व संचालक श्री बापूसाहेब बारहाते यांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले.
तालुक्यातील संवत्सर परिसरातील रामवाडी मधील 1 व गावठाणातील 2 स्वस्त धान्य दुकानात अंतर्गत 1876 लाभार्थ्यांना दिवाळसणानिमीत्त शिंदे-फडणवीस शासनाने दिलेल्या आनंद शिधाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते नुकतेच करण्यांत आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे माजी तालुका उपाध्यक्ष व जेष्ठ कार्यकर्ते श्री रामभाऊ कासार होते. स्वर्गीय.सहकार महर्षी कोल्हे साहेबांची विचारधारा कायम गरीबांना मदत करण्याची राहिलेली आहे असेही ज्ञानेश्वर परजणे यावेळी बोलतांना म्हणाले.
प्रारंभी संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य व भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष श्री महेशजी परजणे प्रास्ताविक करतांना म्हणाले की,भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी तालुक्यावर आलेल्या प्रत्येक संकटात सर्वप्रथम मदत केली आहे. जिल्हा बँकेचे संचालक,युवानेते कारखान्याचे चेअरमन श्री विवेकभैय्या कोल्हे यांनी संवत्सर परिसरातील वंचित घटकांना दिवाळसणानिमीत्त मदत करून आनंद शिधा व्यवस्थीतरित्या वाटप होतो की नाही याबाबतची काळजी घेतली आणि या लाभार्थ्यापर्यंत हा शिधा तात्काळ उपलब्ध करून दिला. शिंदे फडणवीस शासनाने गोर गरीब लाभार्थ्यांना साखर, रवा, तेल आणि दाळ या चार वस्तु अवघ्या शंभर रूपयांत उपलब्ध करून देवुन राज्यात आदर्शवत दिवाळी साजरी करण्यांसाठी धाडसी पाउल उचलले आहे.यावेळी कारखाना संजीवनी पतसंस्था व्हा.चेअरमन श्री.राजेंद्रजी परजणे,श्री.दिलीपजी कासार,श्री.प्रदीपजी लोखंडे,श्री.रामभाऊ कासार,श्री.चिमाजी दैने,श्री.रामभाऊ भाकरे,श्री.संदीपजी मैद,श्री.चिमाजी दैने तसेच स्वस्त धान्य दुकान चालक श्री.मोहनजी ढेपले,श्री.पप्पूजी बागुल,श्री.अक्षयजी बोरावके व मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते
सुत्रसंचलन व आभार भारतीय जनता पार्टी दिव्यांग मोर्चा कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री.मुकुंदमामा काळे यांनी केले.
