
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या संकल्पनेतील “प्रभाग प्रीमियर लीग” चे बक्षीस वितरण ग्रीन फिल्ड टर्फ येथे करण्यात आले. प्रभाग प्रीमियर लीगची सुरुवात रविवार (दि.२०) ग्रीन फिल्ड टर्फ, रुद्र फार्म येथे झाली. स्पर्धेच्या बक्षीस समारंभ प्रभागातील विविध युवक मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
सर्वोत्कृष्ट गोलंदाज व सर्वोत्कृष्ट फलंदाजास आकर्षक परितोषिक वितरण आले आहे. डब्लूसीसी ए संघाने दमदार कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. तर फ्रेंड्स संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. डब्लूसीसी बी संघास तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. तसेच सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचे परितोषिक अंकुश परदेशी यास तर सर्वोत्कृष्ट फलंदाजाचे परितोषिक अथर्व कासार यास वितरण आले आहे. सिंग ११, नागेश्वरी, न्यू विश्वविनायक, मौनगिरी फ्रेंड्स सर्कल, पवनपुत्र, जेजेसीसी, विश्वविनायक, अष्टविनायक ए, अष्टविनायक बी या संघाने स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. क्रिकेट स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक संघाला सन्मानचिन्ह व खेळाडूंना सन्मानपत्र देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या पुढाकाराने प्रभाग प्रीमियर लीगची स्पर्धा १९ व २० मार्च या कालावधीत घेण्यात आली.
