
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात तालुक्यात उत्कृष्ट कामासाठी सन्मान
कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील सवंत्सर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारे संजय पाखले यांचा राष्ट्रीय क्षयरोग दुरिकरन कार्यक्रमात कोपरगाव तालुक्यात उत्कृष्ट काम केल्याबद्दल गटविकास अधिकारी सुर्यवंशीसाहेब यांचे हस्ते नुकताच कोकमठान येथे एका कार्यक्रमात सत्कार करण्यात आला होता त्यांनी क्षयरोग असणाऱ्या रुग्णांचा शोध घेऊन उपचार करून घेतले उद्दीष्ठा प्रमाणे ५१ रुग्ण शोधून उपचारासाठी प्रयत्न केले ३२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत
श्री पाखले यांनी प्रा आ वारी केंद्रात २००४ ते २०१३ पर्यंत कार्यरत असतांना उत्कृष्ट सेवा दिली होती अहमदनगर जिल्ह्यात ८७ क्रमांकावर असणारे वारी प्रा आ केंद्र पहिल्या क्रमांकावर आणले होते
प्राथमिक आरोग्य केंद्र सवंत्सर येथे संजय पाखले हे औषध निर्माता म्हणुन कार्यरत असुन अविरतपने रूग्णांची सेवा करण्यात आनंद मिळतो असे यावेळी बोलताना त्यांनी आवर्जून सांगितले
सेवाभावी वृत्तीमुळे त्यांच्या हातुन असे अतुलनीय कार्य घडत असल्याने वारी पंचक्रोशीतील नागरिकांनी पाखले यांचे अभिनंदन केले आहे वेळेचे बंधन न पाळता सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत ते स्वतः आरोग्य केंद्रात उपस्थित राहुन रूग्ण सेवा देतात हे कौतुकास्पद कार्य असल्याचे यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी सांगून त्यांचे अभिनंदन केले
वारी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना त्यांनी अनेक वेळा नैपुण्य दाखविलेले आहे आणि पुरस्कार देखील मिळविलेले आहेत
आशा योग्य व्यक्तीचा झालेल्या सन्मानाचे वारी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करीत नुकताच वारी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
याप्रसंगी वारीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिशभाऊ कानडे, माजी सरपंच ,सुरेश भाऊ जाधव, मधुकरराव टेके,रावसाहेब टेके, बाबासाहेब शिंदे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे गोकुळचंद सात्राळकर आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदींनी त्यांचे यावेळी अभिनंदन केले
