
कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे वतिने महादेव मंदिरासमोर शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या मानाची होळी साजरी करण्यात आली.गोदावरी नदी काठालगत कोपरगावातील गावठाण, सराफ बाजार सोमेश्वर महादेव मंदिर,
कोपरगाव बेट येथील महादेव मंदिर,जेऊर कुंभारी,गोदावरी नदीलगत गंगेश्वर महादेव मंदिर येथे पारंपरिक पध्दतीने विधीवत पूजन करून होळी साजरी करुन वसंतोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे…
होळी उत्सव अहंकार, द्वेष, मत्सर या विचारांचा समुळ उच्चाटन करुण्याची प्रेरणा देवून माणव कल्याणासाठी सात्विक,सामोपचार आणि सद्भावना विचारांची प्रार्थना करण्यात आली.


कोपरगाव शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर येथे मुंबई स्थित वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार वायखिंडे व सौ.गौरी वायखिंडे या उभयतांचे शुभहस्ते महादेव अभिषेक,पुजा आणि आरती करण्यात आली.या प्रसंगी होळी उत्सवाचे मानकरी म्हणून बाळासाहेब रुईकर पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.तर जेऊर कुंभारी येथे गंगेश्वर महादेव मंदिरात पाटीलबा वक्ते यांचे शुभहस्ते होळी पुजन करण्यात आले.येथे नाना गुरसळ,कुलदिप वक्ते,सहजानंद वक्ते,शत्रुघ्न गांगुर्डे, महेंद्र वक्ते उपस्थित होते.तर महादेव मंदिर बेट येथे व्यवस्थापक ॲड.शामराव मुंदडा यांचे मार्गदर्शनाखाली वाघमारे परिवार यांनी महादेव विधीवत पुजन केले.


सोमेश्वर महादेव मंदिरात सुरुवातीला महादेव मंदिरात विधिवत पुजन झालेवर मंत्रोच्चार व पारंपरिक वाद्य वाजवून होळी पेटविण्यात आली…
या प्रसंगी श्रीमंत महामहीम पवार सरकार महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,सौ.संगिता पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके,व्यवस्थापन समितीचे मनोज कपोते,सौ.कावेरी कपोते,महावीर शिंगी,जयंत विसपुते,प्रदिपशास्री पदे,नंदू शेंडे,सुभाष विसपुते,कुणाल बाविस्कर,ओम कपोते,अनिल उदावंत यांचे सह परिसरातील सोमेश्वर महादेव भक्त उपस्थित होते.
