दलित व आंबेडकरी चळवळीचे सर्वव्यापक नेतृत्व हरपले:- रामदास आठवले…

Uncategorized

कोपरगांव प्रतिनिधी:-
माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी सर्व अठरापगड जातीच्या वंचित घटकांना बरोबर घेत त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मोठे काम केले, त्यांच्या जाण्यांने दलित व आंबेडकरी चळवळीचे सर्व -व्यापक नेतृत्व हरपले अशा शब्दात केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी श्रद्धांजली वाहिली.
गुरुवारी रामदास आठवले यांनी येसगाव कोल्हे वस्ती येथे येऊन सर्वांचे सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी आपल्या शुभविवाहाचा आनंद कोपरगावात लाडु वाटुन साजरा केला होता. अमेरिका सारख्या विकसीत देशात कृषि शिक्षण त्यांनी घेतले, पण भारतवासी शेतकऱ्याप्रती असलेली निष्ठा म्हणून त्यांनी येथील शेती व शेतकरी सुजलाम सुफलाम करण्यासाठी केलेले जाणिवपूर्वक प्रयत्न सर्वांनाच मार्गदर्शक आहेत. धडाडीचे नेतृत्व असुनही ते मनाने हळवे होते. सहकाराला उज्वल करण्याचे काम सर्वांनाच सर्वाना प्रेरणा देणारे आहे. अंधश्रध्देला त्यांनी कधीही थारा दिला नाही. त्यांचे अपूर्ण राहिलेले काम त्यांच्या कुटुंबीयांनी पूर्ण करावे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. कोल्हे कुटुंबियाविषयी असलेल्या जिव्हाळामुळेच आपला व त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. रिपाईचे राज्य सचिव दिपक गायकवाड यांच्यासह अहमदनगर जिल्हयातील आंबेडकरी चळवळीचे सर्व पदाधिकारी मान्यवर यावेळीउपस्थित होते.

फोटो ओळी:- कोपरगाव
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार व केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येसगाव कोल्हेवस्ती येथे येऊन कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *