राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी द्वारकामाई व गुरस्थान मंदीराचेही दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्यावतीने श्री साईबाबांची मूर्ती देऊन राज्यपाल महोदयांचे स्वागत करण्यात आले.


तत्पूर्वी, राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री श्री. विखे पाटील यांनी जिल्ह्याच्यावतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *