जेऊर पाटोदा माय माऊली मंगल कार्यालय येथे १५ मार्चला पारायण व हरिनाम सप्ताहाचे समारोप व महाभंडाराचे आयोजन:- ह.भ.प.नवनाथ खेडकर महाराज…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्री संत ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठाण श्री क्षेत्र जेऊर पाटोदा या ठिकाणी मुर्ती व मंदीराच्या वर्धापन दिना निमित्ताने ७ मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केलेले असुन या हरिनाम सप्ताह पारायणास भाविक भक्तांनी मोठा प्रतिसाद दिला असुन पंचक्रोशीतील नागरिकांनी यावेळी आपली उपस्थित दर्शवली आहे.ह.भ.प श्रीराम महाराज गाडेकर भागवताचार्य,
संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम ह.भ.प नवनाथ महाराज खेडकर,सपुर्ण पारायण वाचक,यावेळी साथसंगत गायनाचार्य ह.भ.प. सोपानकाका बारहाते,ह.भ.प.हरिभाऊ महाराज शिंदे, ह.भ.प.नवनाथ महाराज खेडेकर, ह.भ.प.भिमराज महाराज जाधव, म्रुदुंगाचार्य ह.भ.प.धिरज कुर्हे, ह.भ.प.चैतन्य जाधव, ह.भ.प.क्रुष्णा रोठे, भ.भ.प.नारायण देसाई,ह.भ.प. व्रुंदावनी मोरे, झाकी वेशभूषा ह.भ.प.द्रारका ताई नागरगोजे (खेडकर), ह.भ.प.ज्ञानेश्वर घुगे (माऊली) भागवत कथेतील नियोजन ह.भ.प. अजय कांदे, ह.भ.प.गणेश आव्हाड , ह.भ.प.कार्तिकी चव्हाण करित असुन यांच्या अथंग परिश्रमातुन होत आहे. आश्रमातील बाल कलाकार, व संपुर्ण विद्यार्थी मंडळ स्वयंसेवक ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह सुरु असुन दररोज या प्रसंगी श्रीमद्भागवत कथेचे भागवत कथा रात्री ८ ते १०:३० व प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या झाकी दाखविण्यात येत आहे.दि १२ तारखेला कृष्ण जन्मोत्सव, १३ तारखेला रुक्मिणी स्वयंवर, कंस व श्रीकृष्ण यांचा प्रसंग कथे स्वरूपात साजरा करण्यात आला आहे.

सदरचा कार्यक्रम जेउर पाटोदा माय माऊली मंगल कार्यालयात सुरु असून दि.१५ मार्च २०२२ मंगळवारी सकाळी १० ते १२ वाजता
ह.प.भ.नवनाथ महाराज खेडेकर यांच्या किर्तनाने सांगता होणार आहे याप्रसंगी महाप्रसाद भंडारा यांचे आयोजन केलेले असुन भाविक भक्तासह पंचक्रोशीतील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी सभापती मच्छीद्र केकाण,सरपंच मनिषा सतिष केकाण यांच्यासह आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *