
डॉ.शेफाली भुजबळ यांच्या ‘निसर्गायण’ चित्रप्रदर्शनास कलारसिकांचा वाढता प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
डॉ.शेफाली भुजबळ यांनी रेखाटलेल्या विविध निसर्ग चित्रांचे नाशिक येथील हॉटेल एक्सप्रेस इन ग्रँड्युर हॉल येथे चार दिवसीय ‘निसर्गायण’ हे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास आज केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी भेट देत प्रदर्शनाची पाहणी केली.


यावेळी डॉ.शेफाली भुजबळ यांनी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे स्वागत करत आभार मानले. यावेळी आमदार सीमा हिरे, महेश हिरे, भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, नगरसेवक भगवान दोंदे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.




डॉ.शेफाली भुजबळ यांचे निसर्गायण हे चित्रप्रदर्शन दि.१२ ते १५ मार्च २०२२ पर्यंत आयोजित करण्यात आले असून या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. या चित्रप्रदर्शनास कलरसिकांचा उत्तम असा प्रतिसाद लाभत असून गेल्या दोन दिवसात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या चित्रप्रदर्शनास भेटी देऊन पाहणी केली.
