जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी महासंघ व बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
दिनांक 7/3/2022 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर ओबीसी महासंघ व बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने ओबीसींचे आरक्षण मेहरबान कोर्टाने रद्द करून सरकारच्या दस्त दाखल करण्यातील झालेल्या चुका दुरुस्त करून सोबत इम्परीकल डाटा आवश्यक त्या मसुद्या मध्ये पुन्हा सादर करावा असा आदेश केला, विद्यमान सरकारला हे आरक्षण मनापासून करावयाचे नाही हे या वरून अधोरेखित होत आहे, म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्र भर ओबीसी व्हीजेएनटी परिषद तसेच बारा बलुतेदार महासंघ यांचे वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे जाऊन पदाधिकारी तसेच ओबीसी समाज घटक यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नावाने निवेदन दाखल केले ओबीसींचा एम्पिरिकल डाटा मूळ मसुद्यात त्वरित सादर करावा, त्रिस्तरीय कमेटी द्वारे ओबीसींची जातनिहाय जनगणना करून आरक्षणाचा मार्ग मोकळा करावा, तसेच बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळाची त्वरित घोषणा करावी, अशा मागण्या घेऊन मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले,यावेळी बाराबलुतेदार महासंघाचे विभागीयअध्यक्ष मुकुंद मेटकर, प्रदेशसदस्य ईश्वर मोरे यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हाधक्ष किशोरभाऊ सूर्यवंशी, महिला जिल्हाअध्यक्षा सौ.भारती कुमावत,महानगर अध्यक्ष चंद्रशेखर कापडे शहर महिला अध्यक्षा छाया ताई कोरडे बहुजन मुक्ती मोर्चा चे मुकुंदभाऊ सपकाळे यांचे नेतृत्वात निवेदन देण्यात आले.महानगर अध्यक्ष चंद्रशेखर कापडे यांनी निवेदनातील पूर्ण मसुदा मा. जिल्हाधिकारी श्री अभिजित राऊत साहेब यांचे समोर निवेदन केला,- – – – – – – -या प्रसंगी जिल्हाउपाध्यक्ष सखाराम मोरे,बंटीभाऊ नेरपगारे,महानगर महिला अध्यक्ष सौ. छाया कोरडे, उपाध्यक्ष आरती शिंपी, अलकाताई सोनवणे, पूनम ताई खैरनार,सौ देवरे ताई,वअनिलभाऊ खैरनार,श्यामकांत शिंपी, अशोक पंडित,विलास कुंभार, सुरेशभाऊ पारिस्कर,पवन सिल्लोडकर,संजय सोनवणे,राजू भाऊ सोनवणे,प्रभाकर खर्चे,भास्कर जुनागडे,गणेश भाऊ सुतार देविदास फुलपगारे,वसंत पाटील,गजानन महाजन,रमेश बोरसे,किशोर निकुंभ,सुरेश महाले,,आदी पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश बाराबलुतेदार महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *