
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात ‘नामदार आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत सोमवार (दि.१३) रोजी सायंकाळी पाच वाजता प्रभाग क्रमांक १ समता नगर व परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या व अडचणी श्री साईबाबा संस्थान च्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे हे जनता दरबाराच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत अशी माहिती संपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे
कोपरगाव शहरातील नागरिकांच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लागावे यासाठी ना.आशुतोष काळे यांनी मागील आठवड्यात प्रभाग क्रमांक १० मध्ये जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी या जनता दरबारात अनेक नागरिकांनी समस्यांचा पाढा ना. आशुतोष काळे यांच्यापुढे वाचला. याची गांभीर्याने दखल घेऊन ना.काळे यांनी पालिका प्रशासनाला प्रभाग क्रमांक १० मधील विकासाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा अशा सूचना केल्या. त्यामुळे पालिका प्रशासन देखील ॲक्शन मोडमध्ये आले असून पालिका प्रशासनाने नुकतीच प्रभाग क्रमांक १० मधील प्रलंबित असलेल्या कामांची पाहणी केली आहे. ना. आशुतोष काळे यांच्या जनता दरबारामुळे पालिका प्रशासन प्रभागात हजर होवून कामांची पाहणी करू लागल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले असून नागरिकांनी ना.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.
त्याच पद्धतीने सोमवार (दि.१३) रोजी देखील शहरातील प्रभाग क्रमांक १ समता नगर व परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नामदार काळे स्वतः प्रभाग क्रमांक १ मध्ये ‘नामदार आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सायंकाळी ५.०० वाजता उपस्थित राहणार आहेत. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी व त्या सोडवून घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संपर्क कार्यालयाचे वतीने करण्यात आले आहे
