नागरी समस्या सोडवण्या साठी लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने धरणे आंदोलन अँड.नितीन पोळ…

अहमदनगर

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहर व तालुक्यातील विविध समस्या सोडवणे करिता एक दिवशीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिली आहे.
तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात अँड.पोळ पुढे म्हणाले की कोपरगाव शहर व तालुक्यातील खालील समस्या त्वरित सोडवण्यात याव्यात या मागणी साठी दि २६ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे
धरणे आंदोलनाच्या मागण्या खालील प्रमाणे
डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छ संभाजी महाराज स्मारक रस्ता त्वरित दुरुस्त करण्यात यावा कोपरगाव शहरातील विस्थापित टपरी धारकांना खोका शॉप चे वाटप त्वरित सुरू करावे कोपरगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची उन्हाळ्या तील संभाव टंचाई दूर करण्यासाठी उपाय योजना करावी कोपरगाव कोर्टा शेजारी असलेल्या उपविभागीय पोलीस अधीक्षक कार्यालयाची जागा परत घेऊन वकिलांना ऑफिस साठी गाळे व व्यापारी संकुल बांधण्यात यावे कोपरगाव शहरातील सरकारी जागेवर अतिक्रमण केलेल्या झोपडपट्टी धारकांना त्वरित सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात यावे, कोपरगाव नगर पालिकेच्या मंजूर केलेल्या कामाची शासकीय अंदाज पत्रक तयार करून सदर कामास त्वरित सुरुवात करण्यात यावी कोपरगाव शहर व तालुक्यातील मटका जुगार,बेकायदेशी दारू धंदे त्वरित बंद करण्यात यावे कोरोना साथीच्या कालावधीतील सर्व शासकीय कर ,घरपट्टी, वीजबिल,शेतसारा इ कर माफ करण्यात यावेत
अशा विविध मागण्यांसाठी निवेदन दिले असून या निवेदनावर अँड.नितीन पोळ (प्रदेश अध्यक्ष) सोमनाथ म्हस्के,किरण अढांगळे, सुजल चंदनशिव,बाळू पवार सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *