
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथिल मनसे शहराध्यक्ष
सतिश काकडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कंपनी कोपरगाव शहर व तालुका
यांना निवेदन देण्यात आले कि
कोरोनाच्या काळामध्ये वाढीव वीज बिले आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांने आंदोलने मोर्चे काढल्या
नंतर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत साहेब यांनी विज बिला मध्ये सुट देणार असल्याचे सांगितल्या
मुळे कोरोनाच्या काळात कामधंदा नाही
त्यात वाढीव बिलाने सर्वांना शॉक दिला होता
परंतु मंत्री साहेबांच्या लाईट बिलात सवलत भेटणार या वाक्यामुळे लोकांनी सवलतीच्या आशेपोटी लाईट बिल न भरता परिवाराच्या पोटाची खळगी भरण्याचे ठरविले
ती खळगी भरत असतानाच हळु-हळु कोरोना शिथिल होऊन लोक पुर्व तयारीत येत असतानाच
वीज महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच कोरोना काळातील थकीत लाईट बिल भरण्यासाठी पठाणी वसुली केली आहे
अजून
लोकांना व्यवस्थित काम धंदा नाही व्यवसाय सुरळीत चालत नाही त्यामुळे घराच्या परिवाराचा गाडा ओढणे अवघड झालेले असून
महाराष्ट्र वीज मंडळाने व त्यांच्या काही कर्मचाऱ्यांनी वरचा आदेश आहे या नावाखाली पठाणी वसुली करण्याचे काम सुरू केले आहे
ते थांबून समस्त नागरिकांना आपण कुठेही सवलत दिलेली नाही
त्यामुळे जी आठ महिन्यापासून वाढीव वीज बिला बरोबर व्याजाच्याटक्केवारीने फुगलेली बिले भरण्यासाठी कुठलीही सवलत नसल्यामुळे जनतेत असंतोष निर्माण झालेला असून देखिल लाईट बिल भरण्यास तयार आहे परंतु आपण सर्व
नागरिकांच्या परिवाराचा विचार करून सदर बिलामध्ये कमीत कमी तीन टप्पे करून सदर लाईट बिल भरून घेण्याचे सहकार्य करावे
अन्यथा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी
या वेळी
मनसे शहराध्यक्ष सतिश काकडे
उपशहराध्यक्ष अनिल गाडे/ विजय सुपेकर , उपतालुकाध्यक्ष रघुनाथ मोहिते
, हिंदु सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे, वाहतूक तालुकाध्यक्ष जावेदभाई शेख
, विद्यार्थी शहराध्यक्ष आनंद परदेशी
, उपशहराध्यक्ष संजय जाधव,
मनसे युवा नेते नवनाथ मोहिते
विद्या जिल्हा संघटक बंटी सपकाळ,
वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे,
हिंदु सम्राट संघटना उपाध्यक्ष अनिकेत खैरे
आदि मनसैनिक उपस्थित होते
