श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात दहावीच्या विद्यार्थीचा निरोप समारंभ उत्साहात..!!

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरातील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांतील इयत्ता दहावी मधील विदयार्थीचा निरोप समारंभ मोठा उत्साहाने संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे उपस्थित होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लब चे अध्यक्ष राम थोरे व सचिव अक्षय गिरमे ,यश अॕकेडमी चे इनामदार व जपे आदि उपस्थित होते.
या प्रसंगी इ.दहावीतील विद्यार्थी कु.तनया संत,तन्मय निकम,सुयश जाधव आदि विदयार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.
विदयार्थीनी पुढील वाटचालीत डाॕक्टर कींवा इंजिनिअर होण्या पेक्षा उद्योजक बनावे.आपले व्यक्तीमत्व विकसित करुन उत्तम नागरीक व्हावे आणि देशसेवा करावी असे आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी केले.सध्याची जागतिक स्तरावरील युध्दजन्य परीस्थिती लक्षात घेवुन विदयार्थीनी आपली पुढील वाटचाल ठरवावी असे मत संस्थेचे सचिव दीलीप अजमेरे यांनी मांडले. यश अॕकेडमीच्या वतीने विदयार्थीना रायटींग पॕडचे वितरण करण्यात आले.
प्रारंभी विदयालयांचे आदरस्थान कै.गोकुळचंदजी ठोळे यांच्या पुतळ्याला मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.पाहुण्यांचे स्वागत पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड यांनी केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एस.डी.गोरे तर आभार जेष्ठ शिक्षक बी.बी.कुळधरण यांनी मानले.
यावेळी विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे आदीनी विदयार्थीना एस.एस.सी परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर,व्ही.एन कार्ले,इ.एल.जाधव,आर.आर.लकारे,ए.के.काले,एन.के.बडजाते,एस.एन.शिरसाळे,डी.ए.देसाई,एन.डी.होन,ए.बी.अमृतकर,सौ.एस.एस.अजमेरे आदी शिक्षक व विदयार्थी सोशल डीस्टन्स पाळुन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *