
कोपरगाव प्रतिनिधी:- दिनांक 03/09/2021 रोजी 16.30 ते 18.00वा. दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत बाजार तळ,कोपरगाव येथे श्री गणेश उत्सव तसेच इतर सण उत्सवाच्या अनुषंगाने दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली सदर वेळी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे 03 पोलीस अधिकारी व 17 पोलीस अंमलदार व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे 01 अधिकारी 15 अंमलदार हजर होते.


तसेच कोपरगाव नगरपालिका फायर फायटर व ग्रामीण रुग्णालय अँबुलन्स हजर ठेवण्यात आले होते.सदर दंगा काबू रंगीत तालीम योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.तसेच आगामी काळात साजरे होणाऱ्या सण उत्सव अनुषंगाने सतर्क राहणे बाबत सर्व अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे
