
कोपरगाव प्रतिनिधी
(नाशिक):-
नवाब मलिक हे राज्याचे अल्पसंख्याक, कौशल्य विकास आणि स्वयंरोजगार विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. ते लोकप्रतिनिधी असून त्यांना कोणतीही पूर्वनोटिस न देता ईडीने ताब्यात घेतले आहे.
नवाब मलिक यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या ईडीच्या कारवाईचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जाहीर निषेध करण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या हुकूमशाही कारवाईच्या विरोधात नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग, नाशिक तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, जिल्हा सरचिटणीस दिनेश धात्रक, समन्वयक सुशांत काकड, सरचिटणिस तेजस पाटील, जगदिश पाडवी, राहुल कडाळे, ऋषिकेश गोसावी यांनी राष्ट्रवादी भवन येथे काळे फुगे सोडुन व भाजपाच्या विरोधात घोषणा बाजी करून निषेध व्यक्त केला.

भाजपाचा प्रिय अधिकारी समीर वानखेडेला नवाब मलिक यांनी उघडे पाडले. त्यामुळे मुंबई शहरातील भाजपाची वसुली बंद झाल्याने नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. भाजपचा पोपट म्हणून ईडीने काम करू नये.
शरद पवार साहेब, भुजबळ साहेब, नवाब मलीक साहेब यांच्या घोषणा देण्यात आल्या ….
