आदिनाथ ढाकणे करणार भीक मागून छोट्या पुलाची दुरुस्ती…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी;- गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव शहरात भीक मागून गोदावरी नदीवरील छोट्या पुलाची दुरुस्ती करणार असल्याचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना देत भीक मागो आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. सदर निवेदनाची प्रत नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता बी. आर. औताडे यांनी स्वीकारली.
ढाकणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीवरील शहर व मोहनीराज नगर व बेट भागाला जोडणारा मौनगिरी सेतू असून यावरून मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू असते तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी देखील मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून अनेक वाहन-चालक खड्डे वाचवण्याच्या नादात तोल जाऊन पडत आहे त्यामुळे अनेकांचे छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत.
या पुलाच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली परंतु त्यांच्याकडून अपेक्षित असा प्रतिसाद प्राप्त न झाल्यामुळे या पुलावर एखादी मोठी विपरीत घटना घडण्याच्या आधी कोपरगाव कराच्या दारात जाऊन पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी गुरुवार दि १७ फेब्रुवारी रोजी भीक मागो आंदोलन करून त्यातून मिळालेल्या पैशातून लहान पुलावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याचे ठरविले असून तरी या आंदोलनास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देत ढाकणे यांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *