शिवजयंती निमित्य आयोजित ठोळे उद्योग समुह,लायन्स, लिनेस,लिओ क्लब व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोगनिदान व भव्य रक्तदान शिबीर…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
सर्व रोगनिदान शिबीर व भव्य रक्तदान शिबिर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी 2022 रोजी भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समूह,लायन्स क्लब,लिनेस क्लब व लिओ क्लब आफ कोपरगाव तसेच श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे श्रीमान गोकुळचंद विद्यालय येथे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.अशी माहिती ठोळे उद्योग समूहाचे संचालक श्री राजेश ठोळे यांनी दिली.
या शिबिरामध्ये श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथील अनुभवी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन,सल्ला तसेच आवश्यकता असल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या आजारांवर उपचार केले जातील ज्यामध्ये प्रामुख्याने मेंदूचे सर्व आजार, हाडांचे आजार,डोळ्यांवरील आजार व उपचार,युरो सर्जरी विभाग स्त्रियांचे सर्व आजार व उपचार,होमियोपॅथिक विभाग, हृदयविकार व मेडिसिन विभाग, दातांच्या सर्व आजारांवर उपचार व जनरल सर्जरी विभाग इत्यादी सुविधा उपलब्ध असणार आहेत याशिवाय बी पी,शुगर, ईसीजी तपासणी,मोफत औषधे आणि गरज पडल्यास 2 डी इको, ऍन्जिओग्राफी, एन्जोप्लास्टी आणि बायपास यावरही तपासणी व उपचार मोफत असणार आहे अशी माहिती श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे संचालक श्री प्रसाद कातकडे यांनी दिली.
तरी हे शिबिर सर्वांसाठी अतिशय उपयुक्त असून या शिबिराचा कोपरगाव शहरातील आणि तालुक्यातील गरजू व्यक्तीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील व तालुक्यातील जास्तीत जास्त तरुणांनी आणि व्यक्तींनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सध्याच्या परिस्थितीत जो रक्ताचा तुटवडा जाणवत आहे त्यासाठी मोठ्या संख्येने रक्तदान करावे असे आवाहन लायन्स क्लब कोपरगाव चे अध्यक्ष श्री राम थोरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *