
कोपरगाव प्रतिनिधी:-
तालुक्यातील वारी येथील राहुल ( दादा ) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, कोपरगाव येथील महाराष्ट्र फूट वेअरचे संचालक चेतन टेकचंद खुबानी व कालांश उद्योग समूहाचे संचालक अनिल काले, युवा संचालक रोहित काले यांच्या संयुक्त विद्यमाने वारीतील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना, ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना बूट व खाऊचे बुधवारी (दि.९) वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते राहुल दादा टेके पाटील यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्तविक महारुद्र गालट यांनी केले. वारीतील ११ अंगणवाडीतील गरजू मुलांना ७० बूट, तसेच जिल्हा परिषदेच्या वारी, साकरवाडी व शिरसाठ वस्ती शाळेतील विद्यार्थी, उसतोडणी मजुरांची मुलं अशा जवळपास ७०० मुलांना राजगिरा लाडुच्या पॅकेटचे वाटप केले. तसेच कवट प्रजातीच्या वृक्षाची लागवड करण्यात आली.


या कार्यक्रमासाठी कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, कोपरगाव नगर परिषदेचे स्वच्छ भारत अभियानाचे प्रमुख अधिकारी महारुद्र गालट, कालांश उद्योग समूहाचे संचालक अनिल काले, युवा संचालक रोहित काले, सरपंच सतीश कानडे, उपसरपंच विशाल गोर्डे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर टेके, विवेक टेके, सुवर्णा गजभिव, रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक छबुराव पाळंदे,वारी शाळेचे मुख्याध्यापक सुखदेव कराळे, अंगणवाडी सुपरवाझर रोहिणी गायकवाड, तुषार जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. उपक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक मित्र, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, मित्र परिवार, नातेवाईक, हितचिंतक, कुटुंबीय यांच्यासह वारी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.





फोटोओळी :-
वारी येथे विद्यार्थ्यांना खाऊ व बुटांचे वाटप करण्यात आले.
फोटो१०- खाऊवाटप कोपरगाव:-
