
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने श्रीमंंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान, माझी वसुंधरा अभियान,सूर्यतेज कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद् अहमदनगर जिल्हा शाखा (ग्रामिण), बाल रंगभूमी परिषद,आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, कोपरगाव,अहमदनगर जिल्हा शाखा,कलाशिक्षक,कोपरगाव तालुका यांचे विशेष सहभागातून शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धा – २०२२ आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी दिली आहे.
सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांचे संकल्पनेतून २१ वर्षांपासून शासकीय शिवजयंती उत्सव निमित्ताने शिवप्रेमींच्या सहभागातून चित्रकला,रांगोळी,बाल नाटिका अशा विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करुन लहान मुलांमध्ये छत्रपती शिवाजीराजे यांचे विचार रुजविण्याचे कार्य निरंतर सुरू आहे.सूर्यतेज शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धा करिता गट-अ (५ वी व ६ वी),गट-ब (७ वी व ८ वी),गट-क (९ वी व १० वी),गट-ड खुलागट या प्रमाणे गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे.

स्पर्धेची माहिती, नियम व अटी तयार करण्यात आली असून स्पर्धेस प्रवेश फी नाही.प्रत्येक स्पर्धकास भारतीय टपाल विभागाचे पोस्टकार्ड आयोजकांकडून देण्यात येईल.पोस्टकार्डवर मजकूर लिहिण्याच्या बाजूला छत्रपती शिवाजीराजे अथवा शिवकालिन प्रसंग रंगीत रेखाटून त्यावर “शिवसंदेश” लिहावा. पोस्टकार्डवर कुठल्याही प्रकारचे अलंकारीत वस्तू चिटकवू नये.आपणास आवडते रंगमाध्यम वापरु शकतात. पोस्टकार्ड वापर उभा किंवा आडवा आपल्या सोईस्कर करू शकतात.पोस्टकार्डच्या शिवसंदेशच्या बाजूस ‘सूर्यतेज शिवजन्मोत्सव-२०२२’ असे वरील बाजूस आवर्जून लिहावे.
प्रत्येक स्पर्धकास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.सूर्यतेज शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धेकरिता शाळेतील कलाशिक्षक/कलेचे जाणकार शिक्षक यांनी निवडलेल्या विद्यार्थ्यांनाच सहभाग घेता येईल.पोस्टकार्डवर शिवसंदेश लिहिलेच्या पाठीमागील बाजूस आयोजकांच्या शिक्केच्या वरती स्पर्धकाचे नांव, इयत्ता, शाळेचे नांव, मोबाईल नंबर लिहावा.स्पर्धकांनी साकारलेल्या भेटकार्डचा फोटो संबंधित शिक्षकांनी संग्रहीत ठेवावा.सदर पोस्टकार्ड शाळेतील नियुक्त शिक्षकाने विद्यार्थ्याकडून संकलीतकरून मंगळवार १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी ५.०० वाजेपर्यंत घोडके पेन सेंटर, बिरोबाचौक, कोपरगांव येथे जमा करावेत.
सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र सन्मानपूर्वक वितरण करावे. खुल्या गटातील स्पर्धकांनी श्री. अनिल अमृतकर सर ९८२३९८५१०३ श्री. अतुल कोताडे सर ९८२३२३४२४२ यांचेकडे नांवनोंदवून पोस्टकार्ड घ्यावे.कला शिक्षक / कलेचे जाणकार शिक्षक यांनी पोस्टकार्डवर आपल्याला नेमून दिलेले पत्ते सुवाच्छ अक्षरात बिनचूक लिहावे. स्पर्धेसंदर्भात नियम व अटी आणि हक्क आयोजकांनी राखून ठेवले आहेत.स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी घोडके पेन सेंटर सुशांत आर्टस् & पब्लिसिटी बिरोबा चौक, कोपरगांव मो.९४२३१६६१०३ येथे संपर्क साधावा. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी प्रा.अनिल अमृतकर,प्रा.अतुल कोताडे,प्रा.प्राजक्ता राजेभोसले,प्रा.शिवानी गवळी यांचे सह सूर्यतेज संस्था सदस्य व कलाशिक्षक प्रयत्नशील आहे.सहभागी स्पर्धकांना भारत सरकार आयुष मंत्रालयाचे निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.शिवरत्नजी शेटे यांचे स्वाक्षरी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
