कोपरगांव ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष फ्रायडी फर्नांडीस कार्य अभिमान पुरस्काराने सन्मानीत…

कोपरगाव

कोपरगांव प्रतिनिधी:-
कोपरगांव महाराष्ट्र मायनारिटी खिश्चन डेव्हलपमेंट कौन्सील ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष फ्रायडी फर्नाडीस यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबददल मुंबई सेंट्रल येथे महाराष्ट्र राज्य मायनारिटी ख्रिश्चन समाजाचे वतीने कार्य अभिमान पुरस्कार देवुन नुकतेच सन्मानीत करण्यांत आले. त्याबददल त्यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्य मायनारिटी खिश्चन डेव्लपमेंट कौन्सीलचा आठवा वर्धापनदिन मुंबई येथे साजरा करण्यांत आला त्यात फ्रायडी फर्नांडीस यांना राष्ट्रीय अध्यक्ष अनिल भोसले, महाराष्ट्र राज्य मायनॉरिटी कमिशनच्या माजी उपाध्यक्षा जेनेट डिसुझा, आमदार राजीव आवळे, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ सुधीर तांबे, डॉ राम पुनियानी यांच्या हस्ते सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वैद्यकिय उपचार व अन्य मुलभूत सेवेसाठी व्यक्तीगतरित्या तसेच संजीवनी कोविड सेंटर स्थापन करून मोफत उपचार केले त्यात फ्रायडी फर्नाडीस यांनी कोरोना ग्रस्तांना आवश्यक ती वैदकिय मदत करून त्यांच्यापर्यंत जेवणाचे डबे पोहोच केले तर कोरोनात दिवंगत झालेल्या रूग्णांवर स्वतःच पीपीई किट घालुन अंत्यसंस्कार केलेले आहेत याशिवाय भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या प्रत्येक सामाजिक कार्याची शहरातील गरजवंतापर्यंत माहिती देवुन प्रस्ताव तयार करण्यांत ते नेहमीच अग्रेसर आहेत त्यांच्या या कार्याची दखल महाराष्ट्र राज्य मायनॉरिटी खिश्चन डेव्हलपमेंट कौन्सील ख्रिस्ती समाजाने घेवुन त्यांचा कार्य अभिमान पुरस्काराने सन्मान केला आहे त्याबददल त्यांचे भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, माजी उपनगराध्यक्ष अरिफ कुरेशी, स्वप्निल निखाडे, विजय वाजे, राजेंद्र सोनवणे बबलू वाणी, गटनेते रविंद्र पाठक, योगेश बागुल, सेनेचे कैलास जाधव, व ख्रिस्ती बांधवांनी अभिनंदन केले आहे.

फोटोओळी-
कोपरगांव
कोपरगांव महाराष्ट्र मायनारिटी खिश्चन डेव्हलपमेंट कौन्सील ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष फ्रायडी फर्नाडीस यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबददल त्यांचा कार्य अभिमान पुरस्काराने आमदार राजीव आवळे, आमदार डॉ सुधिर तांबे, जेनेट डिसुझा, यांच्या हस्ते सन्मान करण्यांत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *