सेवानिवृत्त डॉ.अशोक घोरपडे यांचा सत्कार:-मुकुंद मामा काळे…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
पशुवैदयकीय दवाखाना संवत्सर ता.कोपरगाव येथील पशुधन पर्यवेक्षक डॉ.अशोक रंभाजी घोरपडे हे दि.३१ मे रोजी आपल्या सेवेतुन निवृत्त झाले आहेत.त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने संवत्सर येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर बापु परजणे, संजीवंनी पतसंस्था संचालक राजेंद्र परजणे,भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंद मामा काळे,संजुदादा भाकरे,दीनेश बोरनारे,अनिल भाकरे राजेंद्र नवाळे यांच्या उपस्थित अशोक घोरपडे यांचा सत्कार करण्यात आला.
अशोक घोरपडे यांनी १९९९ते २०२१या कालावधीत पशुवैदयकिय सेवेत आपले योगदान दिले असुन काळ व वेळ यांचा विचार न करता चोविस तास पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली आहे हे करत असताना गोर- गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता पैशाची पर्वा न करता फक्त आपले कर्तव्य बजावले आहे.असा हा पशुसेवक आज आपल्या सेवेतुन निवृत्त होत असुन त्यांच्या पुढील वाटचालीस आपण शुभेच्छा देऊ.
-मुकुंद मामा काळे
जिल्हाध्यक्ष अहमदनगर श्री.संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य व भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *