शिक्षण आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतुन कोपरगांव तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंटर वापट संपन्न…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी:-
श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात मा.आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधीतुन कोपरगांव तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंटर वाटप कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कोपरगांवचे गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे होते. अध्यक्षीय भाषणांत ते म्हणाले की
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी आमदार किशोर दराडेच्या निधीतुन मिळालेल्या प्रिंटरचा योग्य वापर करुन डिजिटल तंत्रज्ञानाची कास धरावी आणि त्याचा विदयालयाला फायदा करुन घ्यावा.कोरोना काळात अपुऱ्या साधन सामुग्री मुळे आॕनलाईन अभ्यासक्रम १००%घेता आला नाही पण तो आता शाळा पुन्हा सुरु झाल्यामुळेआॕफलाईन बरोबर आॕनलाईन दोन्ही पध्दतीने सुरु करावा असे त्यांनी सुचविले.आमदार किशोर दराडे यांनी शाळांना प्रिंटर वाटप केल्याबद्दल शिक्षण विभागाच्या वतीने त्यांनी आमदारांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप अजमेरे,आमदारांचे स्वीय सह्यायक हरीष मुंडे,शिक्षण विस्तार अधिकारी शबाना शेख,मुख्याध्यापक संघाचे सचिव शिवाजी लावरेसर,मा.आमदार किशोर दराडेचे संपर्क प्रमुख कीरण गायकवाड ,पर्यवेक्षक आर.बी.गायकवाड,जेष्ठ शिक्षक डी.व्ही.तुपसैंदर आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे यांच्या हस्ते गोकुळचंद ठोळे यांच्या पुतळ्याला पुप्षहार घालण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुरेश गोरे यांनी केले.आभार श्रीमती यु एस.रायते यांनी मानले.या कार्यक्रमाला कोपरगांव तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *