कोपरगाव प्रतिनिधी:-
कोळपेवाडी वार्ताहर :-
श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे लवकरात लवकर कोरोनामुक्त होवून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी मुस्लीम बांधवांनी कोपरगाव येथील मोहम्मदिया मस्जिदमध्ये नमाज पठण करून दुवा मागितली.
ना.आशुतोष काळे यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घरीच उपचार घेत आहेत. त्यांना चांगले आरोग्य लाभावे व कोरोनातून त्यांची लवकर मुक्तता व्हावी यासाठी कोपरगाव शहरातील मोहम्मदिया मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवांनी नमाज पठण करून ना. आशुतोष काळे यांना चांगले आरोग्य लाभावे यासाठी दुवा मागितली.
यावेळी राष्ट्रवादी युवक नगराध्यक्ष नवाज कुरेशी, फकीर कुरेशी, जावेद शेख, इम्तियाज अत्तार,राजु अत्तार, युसूफ अत्तार, राजु मन्सूरी, अय्युब शेख, शाहरुख कुरेशी, मौलाना मुक्तार, आमीन शेख, दगडू बागवान, आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.

फोटो ओळ :-
ना.आशुतोष काळे कोरोनामुक्त व्हावे यासाठी नमाज पठण करतांना मुस्लीम बांधव.
