सटाणा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीबाबत सकारात्मक प्रयत्न करू:-ना.छगन भुजबळ…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक/सटाणा):- सटाणा न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीबाबत मुख्यमंत्री व विधी व न्याय खात्याचे मंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू असे प्रतिपादन पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांनी केले आहे.
सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम होण्यासाठी येथील वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री ना.भुजबळ यांची भेट घेवून वरील मागणीचे निवेदन दिले त्यावेळी भुजबळ बोलत होते.
सटाणा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीचे सन १८८३ मध्ये बांधकाम झाले असून सध्याच्या स्थितीत कामकाज करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे येथे नवीन विस्तारित इमारत बांधणे गरजेचे असल्याचे सटाणा वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ना.भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिले.
विधी व न्याय खाते हे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्याकडेच असून त्यांची प्रत्यक्ष भेट घेवून नवीन इमारतीबाबत चर्चा करून हा प्रश्न सोडवू असे आश्वासन ना.भुजबळ यांनी यावेळी बोलतांना दिले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, सटाणा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पंडितराव भदाणे, उपाध्यक्ष अॅड.एन.पी.चंद्रात्रे, सचिव अॅड.आर.एम.जाधव, अॅड.सी.एन.पवार, अॅड.पी.के.गोसावी, संदीप अहिरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

फोटो ओळी:- सटाणा येथील न्यायालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम होण्यासाठी पालकमंत्री ना.छगन भुजबळ यांना निवेदन देतांना सटाणा वकील संघाचे अध्यक्ष अॅड.पंडितराव भदाणे समवेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार, संदीप अहिरे, अॅड.आर.एम.जाधव, अॅड.सी.एन.पवार, अॅड.एन.पी.चंद्रात्रे, अॅड.पी.के.गोसावी आदि दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *