शिर्डी उप विभागीय अधिकारी कार्यालय प्रजासत्ताक दिन साजरा, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न:- सुरेश पाटील…

कोपरगाव

कोपरगाव प्रतिनिधी
(शिर्डी):-
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शिर्डी उप विभागीय अधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण समारंभ आज नगरपंचायत व्यापारी संकुल इमारतीच्या प्रांगणात साजरा झाला. शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, मान्यवर, नागरीक आदींना प्रांताधिकारी यांनी यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या समारंभास शिर्डीचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे , पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित होते. यावेळी शासनाने ठरवून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *